UP ELECTION 2017 : उत्तरप्रदेशमध्ये 7 व्या टप्प्याचे मतदान सुरु
By admin | Published: March 8, 2017 08:11 AM2017-03-08T08:11:19+5:302017-03-08T08:13:25+5:30
आज उत्तरप्रदेशच्या 40 आणि मणिपूर विधानसभेच्या 22 जागांसाठी शेवटच्या टप्प्याचे मतदान होत आहे.
Next
ऑनलाइन लोकमत
लखनऊ, दि. 8 - मागच्या महिन्याभरापासून विधानसभा निवडणुकांसाठी मतदान सुरु असून, आज उत्तरप्रदेशच्या 40 आणि मणिपूर विधानसभेच्या 22 जागांसाठी शेवटच्या टप्प्याचे मतदान होत आहे. अखेरच्या टप्प्यात वाराणासीमध्ये मतदान होत असून वारणासी हा पंतप्रधान नरेंद्र मोदींचा लोकसभा मतदारसंघ आहे.
त्यामुळे सगळयांचे लक्ष वाराणासीच्या निकालाकडे आहे. पंतप्रधान मोदी आणि त्यांच्या मंत्रिमंडळाने अखेरच्या टप्प्यात वाराणासी आणि पूर्वांचलमध्ये चांगलाच जोर लावला. पंतप्रधानांचा तीन दिवस वाराणासीमध्ये मुक्काम होता. या दरम्यान त्यांनी रोड शो आणि जाहीर सभा घेतल्या.
दोन्ही राज्यांमध्ये कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. सकाळी 7 वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली आहे. मतदारांना संध्याकाळी 5 वाजेपर्यंत मतदानाचा हक्क बजावता येईल. 11 मार्चला शनिवारी पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर होतील.
People cast their vote at polling booth 127 in Mohammadabad, Mukhtar Ansari's brother Sibakatullah contesting from the seat as BSP candidate pic.twitter.com/nZsQIXeGhf
— ANI UP (@ANINewsUP) March 8, 2017