UP Election 2017 : सपा-बसपा म्हणजे एक ही थाली के चट्टे बट्टे - मोदी
By admin | Published: March 5, 2017 10:02 PM2017-03-05T22:02:15+5:302017-03-05T23:15:43+5:30
सपा-बसपा म्हणजे एक ही थाली के चट्टे बट्टे है प्रकारातले आहे आणि काँग्रेस म्हणजे काही वर्षांनंतर एक पुरातत्व विभाग सुरु करावा लागेल, काँग्रेस नावाची कोणती पार्टी होती का याचा शोध घ्यायला लागेल
ऑनलाइन लोकमत
वाराणसी, दि. 5 - महाराष्ट्रातील विजयाचा दाखला देत, भविष्यात पुरातत्व विभागाला काँग्रेस पक्ष शोधण्याचे काम करावे लागेल, असा टोला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लगावला. वाराणसीत सलग दुसऱ्या दिवशी मोदी यांचा रोड शो झाला. या मेगा शोनंतर जाहीर सभेत बोलताना मोदींनी काँग्रेससह समाजवादी पक्ष आणि बहुजन समाज पक्षावरही तोफ डागली. सपा-बसपा म्हणजे एक ही थाली के चट्टे बट्टे है प्रकारातले आहे.
काही राज्यांमध्ये डाव्यांचे सरकार आहे. उदाहर्णार्थ पश्चिम बंगाल. तिथे गरिबी, कायद्याचा धाक नसणे यासारख्या गोष्टी मोठ्या प्रमाणात आहेत. चांगले सरकार देण्यावर आमचा भर आहे, आम्ही जनतेबरोबर कनेक्टेड आहोत, त्यांच्या अडचणींची आम्ही नोंद घेतो आणि त्यांची अडलेले कामं वेळेत पूर्ण होईल याची काळजी घेतो. देशात भाजपाने ज्या राज्यांमध्ये सत्तेत होतं किंवा आत्ता आहे तिथे आम्ही विकासावर लक्ष्य केंद्रित केलेले आहे असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. देशातील तरूण मरणाला मुठीमध्ये घेऊन शत्रुला धडा शिकवण्यासाठी गेले होते आणि सकाळी येऊन करवाई यशस्वी झाल्याची बातमी दिली असे म्हणत मोदींनी सर्जिकल स्ट्राइक करण्याऱ्या जवानांचे कौतुकही केले.
उत्तर प्रदेशमधील ३० लाख कुटुंबांना घरांची गरज आहे, केंद्राने राज्य सरकारकडून गरजू कुटुंबांची यादी मागवली तर राज्य सरकार अजूनही झोपलेलेच आहे, जे यादी देऊ शकत नाही ते घर काय देणार असे म्हणतं त्यांनी अखिलेश यादव यांच्यावर टीका केली. आम्हाला राज्यात रिंग रोड बांधायचे होते मात्र राज्य सरकारने त्यासाठी सहकार्य केले नाही, त्यांनी अनेक अडचणी आणल्या आहेत. नेत्यांनी, सरकारी बाबूंनी देशाला लुटले आहे, छोट्या लोकांना त्रास होऊ देणार नाही मात्र त्यांना लुटणाऱ्यांना मी सोडणार नाही.
देशात जो एखाद्या पदावर बसला आहे, ज्याला कागदांवर फायलींवर सह्या करण्याचा अधिकार मिळाला आहे अशाच लोकांनी देशाला लुटले आहे. आधी लोकं विचारायचे किती गेले, आता विचारतात मोदीजी किती आले, काशीच्या लोकांना त्यांच्या खासदारावर गर्व असेल कारण त्याच्यावर एकही आरोप नाहीये असेही मोदी म्हणाले.