UP Election 2017: उत्तर प्रदेश 57 टक्के, मणिपूरमध्ये 84 टक्के मतदान

By admin | Published: March 4, 2017 10:39 AM2017-03-04T10:39:01+5:302017-03-04T20:26:33+5:30

संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी आज सहाव्या टप्प्यातील मतदान झाले.

UP Election 2017: Uttar Pradesh 57 percent, Manipur 84 percent polling | UP Election 2017: उत्तर प्रदेश 57 टक्के, मणिपूरमध्ये 84 टक्के मतदान

UP Election 2017: उत्तर प्रदेश 57 टक्के, मणिपूरमध्ये 84 टक्के मतदान

Next

ऑनलाइन लोकमत

लखनऊ, दि. ४ - संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी आज सहाव्या टप्प्यातील मतदान झाले. विधानसभेच्या 49 जागांसाठी उत्तरप्रदेशात 57 टक्के मतदान झाले तर, मणिपूरमध्ये विधानसभेच्या 38 जागांसाठी तब्बल 84 टक्के मतदान झाले.
 
समाजवादी पक्षाचे अध्यक्ष  मुलायमसिंह यादव यांचा आझमगड लोकसभा मतदारसंघ, तसेच  भाजप खासदार योगी आदित्यनाथ यांचा गोरखपूर मतदारसंघासह  मऊ, महाराजगंज, कुशीनगर, देवरिया आणि बलिया या भागांतील मतदारसंघात मतदान पार पडले. तर विधानसभा निवडणुकीच्या सातव्या व अंतिम टप्प्यासाठी ८ मार्च रोजी मतदान होणार असून त्याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आज रोड शो झाला. 
 
दरम्यान  ४९ विधानसभा मतदारसंघांमध्ये १७, ९२६ मतदान केंद्र असून १ कोटी ७२ लाख मतदार मतदानाचा हक्क बजावतील. त्यामध्ये ९४ लाख ६० हजार पुरुष तर ७७ लाख ८४ हजार महिला मतदारांचा समावेश आहे.
 
मणिपूर विधानसभेसाठीही आज मतदान होत असून एकूण ३८ जागांसाठी कडेकोट बंदोबस्तात मतदानाला सुरूवात झाली. यावेळी ९ लाख २८ हजार ५७८ पुरूष तर ९ लाख ७३ हजार ९८९ महिला १६८ उमेदवारांच्या भविष्याचा निर्णय देतील. एकूण १६४३ मतदान केंद्रांवर मतदान होत असून त्यापैकी ८३७ मतदान केंद्रे अतिसंवेदनशील घोषित करण्यात आली आहेत.  दरम्यान सामाजिक कार्यकर्त्या इरोम शर्मिला यांनीही मतदानाचा अधिकार बजावला.
 

Web Title: UP Election 2017: Uttar Pradesh 57 percent, Manipur 84 percent polling

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.