Election 2022 New Guidelines : सकाळी ६ ते रात्री १० पर्यंत प्रचारास मुभा, पदयात्राही करता येणार; EC नं जारी केल्या नव्या गाईडलाईन्स

By ऑनलाइन लोकमत | Published: February 12, 2022 10:08 PM2022-02-12T22:08:08+5:302022-02-12T22:12:06+5:30

निवडणूक आयोगानं शनिवारी निवडणुकीच्या प्रचारासाठी नव्या गाईडलाईन्स जारी केल्या.

Election 2022 New Guidlines Campaign is allowed from 6 am to 10 pm New guidelines issued by EC | Election 2022 New Guidelines : सकाळी ६ ते रात्री १० पर्यंत प्रचारास मुभा, पदयात्राही करता येणार; EC नं जारी केल्या नव्या गाईडलाईन्स

Election 2022 New Guidelines : सकाळी ६ ते रात्री १० पर्यंत प्रचारास मुभा, पदयात्राही करता येणार; EC नं जारी केल्या नव्या गाईडलाईन्स

Next

निवडणूक आयोगानं (Election Commission) शनिवारी निवडणुकीच्या प्रचारासाठी नव्या गाईडलाईन्स जारी केल्या. यानुसार आता पदयात्रेवर घालण्यात आलेली बंदी हटवण्यात आली आहे. तसंच प्रचाराचा कालावधी दोन तासांनी वाढवण्यात आलाय. राजकीय पक्ष आणि सर्व उमेदवार सर्व नियमांचं पालन करत सकाळी ६ ते रात्री १० वाजेपर्यंत प्रचार करू शकतात.

निवडणूक प्रचारासाठी वेळेची मर्यादा शिथिल करताना आयोगाने स्थळाच्या क्षमतेनुसार रॅलींनाही परवानगी दिली आहे. तसंच निवडणूक आयोगानं मतदान असलेल्या राज्यांमध्ये कोरोनाच्या प्रकरणांमध्ये घट झाल्याचं सांगत निर्बंध शिथिल केले. "केंद्रीय आरोग्य सचिवांकडून मिळालेल्या माहितीनुसार कोरोनाच्या प्रकरणांमध्ये घट दिसून आली आहे आणि देशातही कोरोनाबाधितांची संख्या मोठ्या प्रमाणात कमी होत आहे," असं त्यांनी सांगितलं.


निवडणूक आयोगानं सकाळी ८ ते रात्री ८ ऐवजी आता सकाळी ६ ते रात्री १० वाजेपर्यंत प्रचाराला परवानगी दिली आहे. जिल्हाधिकाऱ्यांकडून परवानगी दिलेल्या ठराविक संख्येतच पदयात्रेला परवानगी देण्यात आली आहे. यापूर्वी निवडणूक आयोगानं ८ जानेवारी रोजी उत्तर प्रदेश, उत्तराखंड, गोवा, पंजाब आणि मणिपूरसाठी मतदान कार्यक्रमाची घोषणा केली होती. तसंच रॅली, रोड शो आदिंवर निर्बंध घालण्यात आले होते.

Web Title: Election 2022 New Guidlines Campaign is allowed from 6 am to 10 pm New guidelines issued by EC

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.