UP Election : ज्योतिषी म्हणतात, धक्कादायक असतील यावेळचे निकाल

By admin | Published: March 8, 2017 03:26 PM2017-03-08T15:26:29+5:302017-03-08T15:26:29+5:30

उत्तर प्रदेशच्या निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींसह राहुल गांधी, अखिलेश यादव आणि मायावती या दिग्गज नेत्यांनी सर्वस्व पणाला लावलेले असल्याने, सर्वांनाच

UP Election: Astrologer says, the results of this time will be shocking | UP Election : ज्योतिषी म्हणतात, धक्कादायक असतील यावेळचे निकाल

UP Election : ज्योतिषी म्हणतात, धक्कादायक असतील यावेळचे निकाल

Next
>ऑनलाइन लोकमत
वाराणसी, दि. 8 - गेल्या महिनाभरापासून सुरू असलेली उत्तर प्रदेशसह पाच राज्यातील निवडणूक प्रक्रिया आज पूर्ण होत आहे. विशेषत: उत्तर प्रदेशच्या निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींसह राहुल गांधी, अखिलेश यादव आणि मायावती या दिग्गज नेत्यांनी सर्वस्व पणाला लावलेले असल्याने, सर्वांनाच या निवडणुकीच्या निकालांची उत्सुकता लागली आहे. आता धर्मनगरी  वाराणसीतल्या ज्योतिषांनीही नक्षत्रांच्या चालींवरून निकालाबाबत भाकीत करत उत्सुकता वाढवली आहे. 
यंदाच्या उत्तर प्रदेशमधील निवडणुकीचे निकाल धक्कादायक असतील, या निकालांमुळे भल्याभल्या नेत्यांच्या कपाळावर आठ्या पडतील, असे भविष्य काशीचे ज्योतिषी आणि पंडितांनी वर्तवले आहे. काशी विश्वनाथ मंदिर न्यासाचे सदस्य असलेल्या  प्रा. चंद्रमौळी उपाध्याय यांनी सांगितले की, मतमोजणीच्या दिवशी सिंह राशीमध्ये चंद्रमा आणि राहूच्या युतीमुळे  ग्रहणाचा योग आहे. त्यामुळे त्याचा प्रभाव निकालांवरही दिसून येईल. त्यामुळे अंदाजांपेक्षा विपरित असे निकाल हाती येतील आणि आधी वर्तवण्यात आलेले अंदाज, भाकिते खोटी ठरतील. तसेच पाच राज्यातील निवडणुकांमध्ये दबदबा राखण्यासाठी प्रयत्नशील असलेले पक्ष आणि नेत्यांचा हाती निराशा लागेल.
तर अखिल भारतीय विद्वत्त परिषदेचे महामंत्री डॉ. कामेश्वर उपाध्याय यांनी निवडणूक प्रचारापासून मतमोजणीपर्यंतच्या ग्रहांच्या स्थितीचा निकालांवरप परिणाम होणार असून, त्यामुळे यंदाचे निकाल धक्कादायक पण लोकशाहीसाठी प्रेरक असतील, असे सांगितले.  ज्योतिष शास्त्री पंडित दीपक मालवीय यांनीही यंदाचे निकाल धक्कादायक असतील, असे सांगितले. 
 

Web Title: UP Election: Astrologer says, the results of this time will be shocking

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.