निवडणुकीसाठी सर्वात जास्त देणगी देणाऱ्यांची अन् घेणाऱ्यांची यादी, वाचा सविस्तर
By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2024 10:58 AM2024-03-15T10:58:46+5:302024-03-15T10:59:26+5:30
एसबीआयने गुरुवारी दिलेल्या इलेक्टोरल बाँड्सची माहिती निवडणूक आयोगाने सार्वजनिक केली आहे.
Election Bonds ( Marathi News) : सुप्रीम कोर्टाने फटकारल्यानंतर मंगळवारी सायंकाळी भारतीय स्टेट बँकने निवडणूक रोख्यांचा तपशील निवडणूक आयोगाकडे दिला होता. कोर्टाच्या आदेशानुसार निवडणूक आयोगाला हा तपशील उद्या १५ मार्चपर्यंत आपल्या वेबसाइटवर प्रसिद्ध करणे अनिवार्य होते. या पार्श्वभूमीवर केंद्रीय निवडणूक आयोगाने काल १४ मार्च रोजी सायंकाळीच निवडणूक रोख्यांबाबतचा तपशील आपल्या वेबसाइटवर प्रसिद्ध केला आहे.
एकूण २२,२७१ रोखे खरेदी करण्यात आल्याचे उल्लेखनीय आहे. मात्र, या यादीत कोणी कोणाला देणगी दिली हे समोर आलेले नाही. दोन्ही याद्यांमध्ये बाँड विकत घेतलेल्यांची नावे असून त्यांची पूर्तता करणाऱ्यांची नावे आहेत, मात्र हे पैसे कोणत्या पक्षाला देण्यात आले, याची माहिती नाही. १,३३४ कंपन्या आणि व्यक्तींनी ५ वर्षांत १६,५१८ कोटी रुपयांचे रोखे खरेदी केले आहेत.
टॉप १० देणगीदारांची यादी
फ्यूचर गेमिंग- १,३६८ कोटी रुपये
मेघा इंजीनियरिंग- ९८० कोटी
क्विक सप्लाई चेन - ४१० कोटी
वेदांता लि. -४०० कोटी
हल्दिया एनर्जी -३७७ कोटी
भारती ग्रुप -२४७ कोटी
एस्सेल माइनिंग- २२४ कोटी
प. यूपी पावर कॉर्पोरेशन-२२० कोटी
केवेनटर फूड पार्क-१९४ कोटी
मदनलाल लि.- १८५ कोटी
टॉप १० देणगी घेणारे पक्ष
भाजप- ६,०६० कोटी
टीएमसी- १,६०९ कोटी
काँग्रेस- १,४२१ कोटी
बीआरएस- १,२१४ कोटी
बीजेडी- ७७५ कोटी
डीएमके- ६३९ कोटी
वायएसआर काँग्रेस -३३७ कोटी
टीडीपी- २१८ कोटी
शिवसेना- १५८ कोटी
आरजेडी- ७२.५० कोटी