बिग ब्रेकिंग! वयाच्या १७ वर्षानंतर बनवा मतदार ओळखपत्र; निवडणूक आयोगाचं मोठं पाऊल

By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2022 01:16 PM2022-07-28T13:16:40+5:302022-07-28T13:17:26+5:30

आता नव्या मतदारांना १ एप्रिल, १ जुलै आणि १ ऑक्टोबरपासून मतदार यादीत नाव नोंदवण्यासाठी अर्ज भरता येऊ शकतो.

Election Commission allows students above 17 years to apply in advance for Voter ID card | बिग ब्रेकिंग! वयाच्या १७ वर्षानंतर बनवा मतदार ओळखपत्र; निवडणूक आयोगाचं मोठं पाऊल

बिग ब्रेकिंग! वयाच्या १७ वर्षानंतर बनवा मतदार ओळखपत्र; निवडणूक आयोगाचं मोठं पाऊल

googlenewsNext

नवी दिल्ली - मतदार यादीत नाव नोंदवण्यासाठी आता वयाची १८ वर्ष पूर्ण होण्याची वाट पाहावी लागणार नाही कारण निवडणूक आयोगाने याबाबत नवीन निर्देश दिले आहेत. आता १७ वर्षावरील युवक-युवतींना यादीत आगाऊ अर्ज भरण्याची मुभा देण्यात आली आहे. मतदार नोंदणीबाबत तांत्रिक बाबी दूर करण्याचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार आणि निवडणूक आयुक्त अनुप चंद्र पांडे यांनी सर्व राज्यातील निवडणूक आयोगांना आदेश दिले आहेत.

निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार, आता मतदार यादीत नोंदवण्यासाठी १ जानेवारीला वयाची १८ वर्ष पूर्ण होण्याची वाट पाहावी लागणार नाही. तरूण १७ वर्षापेक्षा अधिक असतील तर त्यांना मतदार यादीत नाव नोंदवण्यासाठी अर्ज भरावा लागेल. आता नव्या मतदारांना १ एप्रिल, १ जुलै आणि १ ऑक्टोबरपासून मतदार यादीत नाव नोंदवण्यासाठी अर्ज भरता येऊ शकतो. प्रत्येक तिमाहीला मतदार यादी अपडेट केली जाईल. यातील पात्र मतदारांना पुढच्या तिमाहीत वयाची १८ वर्ष पूर्ण झाल्यावर मतदान करता येईल. 

तसेच नोंदणी झाल्यानंतर नव मतदारांना निवडणूक आयोगाचं ओळखपत्र जारी केले जाईल. मतदार यादी २०२३ मध्ये त्यात बदल केले जातील. कुठलाही नागरिक १ एप्रिल, १ जुलै आणि १ ऑक्टोबर २०२३ पर्यंत १८ वर्ष पूर्ण होतील त्याची नव्या मतदार यादीत नाव समाविष्ट असेल. अलीकडेच आरपी अधिनियमात दुरुस्ती करण्यात आली आहे. त्यानुसार मतदार यादीत नाव नोंदवण्यासाठी योग्यता वर्षातून तिनवेळा देण्यात येईल. याआधी केवळ १ जानेवारीची पात्रता तारीख मानली जात होती. 

त्याचसोबत आधार कार्डबाबत आयोगाने सांगितले की, आधार नंबर मतदार यादीशी जोडण्याबाबत नोंदणी फॉर्ममध्ये मतदारांसाठी तरतूद करण्यात आली आहे. सध्याच्या मतदारांसाठी आधार नंबर लिंक करावा यासाठी नवीन फॉर्म ६ ब आणला आहे. मतदार यादीत नाव नोंदवण्यासाठी कुठल्याही अर्जाला नकार देण्यात येणार नाही. 

ऑनलाइन अर्जासाठी काय कराल?
मतदार यादीत नाव असलेला प्रत्येक मतदार त्याचा आधार क्रमांक अर्ज क्र. ६ ब मध्ये भरून देऊ शकतो. 
या अर्जाच्या छापील प्रती मतदारांना उपलब्ध केल्या जातील. 
याशिवाय हा अर्ज क्र. ६ ब हा भारत निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावरही उपलब्ध होईल.
अर्ज क्रमांक ६ द्वारे भरा महिती- नमुना अर्ज क्र. ६, ७ व ८ मध्ये १ ऑगस्टपासून सुधारणा करण्यात येत आहेत. नमुना ६ ब नव्याने तयार केला आहे. सुधारित अर्जानुसारच मतदारांनी मतदार यादीतील बदल अथवा नोंदणीची प्रक्रिया करावी.
 

Web Title: Election Commission allows students above 17 years to apply in advance for Voter ID card

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.