निवडणूक आयोगाने दिले EVM हॅक करण्याचे आव्हान
By admin | Published: May 12, 2017 10:47 PM2017-05-12T22:47:15+5:302017-05-12T22:47:15+5:30
इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्राबद्दलचा संशय दूर करण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने शुक्रवारी सर्वपक्षीय बैठक बोलवली होती.
Next
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 12 - इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्राबद्दलचा संशय दूर करण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने शुक्रवारी सर्वपक्षीय बैठक बोलवली होती. या बैठकीत आयोगाने सर्वच पक्षांना ईवीएम मशीन हॅक करुन दाखवण्याचे खुले आव्हान दिले आहे. या सर्वपक्षीय बैठकीमध्ये सात राष्ट्रीय पक्षांसह 48 प्रादेशिक पक्षांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते.
दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदीया यांनी निवडणूक आयोगाचे आव्हान स्वीकारले असून, मतदान यंत्राबरोबर छेडछाड शक्य असल्याचे सिद्ध करुन दाखवू असे त्यांनी सांगितले. निवडणूक आयोगाने राजकीय पक्षांना ईव्हीएम मशीनबरोबर छेडछाड शक्य नसल्याचे पटवून देण्याचा प्रयत्न केला. दिल्लीच्या कॉन्स्टिटट्यूशन क्लबमध्ये ही बैठक झाली.
निवडणूक आयोगाने भविष्यातील विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुकांमध्ये मतदान केल्यानंतर पावती उपलब्ध करुन देणा-या व्हीव्हीपीएटी इलेक्ट्रॉनिक मशीन्स वापर करण्याचे आश्वासन दिले. गुजरात आणि हिमाचलप्रदेशच्या विधानसभा निवडणुकीत व्हीव्हीपीएटी मशीन्सचा वापर केला जाण्याची शक्यता आहे. दिवसभर चाललेल्या बैठकीत राजकीय पक्षांनीही त्यांची बाजू मांडली.