लोकसभा निवडणुकांचं बिगुल वाजणार, आयोगाची आज पत्रकार परिषद
By ऑनलाइन लोकमत | Published: March 10, 2019 11:10 AM2019-03-10T11:10:21+5:302019-03-10T11:51:32+5:30
लोकसभेचं वेळापत्रक आजच जाहीर होण्याची शक्यता आहे. संध्याकाळी 5 वाजता निवडणूक आयोग पत्रकार परिषद घेणार आहे.
नवी दिल्ली - लोकसभेचं वेळापत्रक आजच जाहीर होण्याची शक्यता आहे. संध्याकाळी 5 वाजता निवडणूक आयोग पत्रकार परिषद घेणार आहे. यामध्ये लोकसभा निवडणुकांच्या तारखांची घोषणा होण्याची शक्यता आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भाजपाच्या मंत्र्यांना सर्वच विकासकामांची उद्धाटने 8 मार्चपर्यंत पूर्ण करण्याचे बजावले होते. त्यामुळे 9 मार्चला निवडणूक आयोगाकडून लोकसभा निवडणुकांची घोषणा होईल, अशी दाट शक्यता वर्तवली जात होती. मात्र, हा अंदाज खोटा ठरला असून आयोगाने आज पत्रकार परिषद बोलावली आहे. त्यामुळे आजच निवडणुकांचे रणशिंग फुंकले जाईल, असे दिसून येते. आयोगाने निवडणुकांची घोषणा करताच आचारसंहिता लागू होईल. दरम्यान, आता निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेकडे देशाचे लक्ष लागले आहे.
Election Commission of India to hold a press conference at 5pm today. pic.twitter.com/M8hrrpQBr4
— ANI (@ANI) March 10, 2019
भारत आणि पाकिस्तानमध्ये वाढलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर लोकसभा निवडणुकीच्या कार्यक्रमाबाबत अनिश्चिततेचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र देशात लोकसभा निवडणुका वेळेवरच होतील, असे मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोडा यांनी काही दिवसांपूर्वी स्पष्ट केले आहे. भारतीय हवाई दलाने केलेल्या एअर स्ट्राइकनंतर सीमारेषेवर निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर लोकसभा निवडणुका पुढे ढकलण्यात येतील अशी शक्यता वर्तवण्यात आली होती. मात्र मुख्य निवडणूक आयुक्तांनी दिलेल्या स्पष्टीकरणानंतर आता निवडणुकीच्या कार्यक्रमाबाबतचे चित्र स्पष्ट झाले होते. तसेच इव्हीएमवर घेण्यात येणाऱ्या शंकांबाबतही मुख्य निवडणूक आयुक्तांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती. ''आम्ही जाणते अजाणतेपणी इव्हीएमचा फुटबॉल बनवला आहे. निकाल मनासारखे लागले तर ईव्हीएम चांगल्या आणि निकाल विरोधात गेले तर इव्हीएम खराब असे आरोप केले जातात.'' असे ते म्हणाले होते.
लोकसभेचं वेळापत्रक आजच जाहीर होण्याची शक्यता, संध्याकाळी 5 वाजता निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद #LokSabhaElections2019
— Lokmat Media Pvt Ltd (@MiLOKMAT) March 10, 2019
भारतीय जवानांचे फोटो प्रचारात वापरू नका; निवडणूक आयोगाची सक्त ताकीद
भारतीय हवाई दलाने केलेला एअर सर्जिकल स्ट्राईक, विंग कमांडर अभिनंदन, पाकिस्तानचे पाडलेले विमान, पुलवामा हल्ला अशा घटनांचा वापर हा स्थानिक तसेच राष्ट्रीय पक्षातील नेत्यांनी पोस्टर्सवर केला आहे. प्रचाराच्या रणधुमाळीला सुरुवात झाली असून सर्वच पक्षाने आपली कंबर कसली आहे. मात्र कोणत्याही राजकीय पक्षांनी संरक्षण दलातील कोणत्याही व्यक्तीचे छायाचित्र निवडणूकप्रचारामध्ये न वापरण्याची सक्त ताकीद निवडणूक आयोगाने दिली आहे. शनिवारी (9 मार्च) निवडणूक आयोगाची एक बैठक पार पडली. या बैठकीमध्ये प्रचारादरम्यान सैन्याचा वापर करू नका अशी ताकीद निवडणूक आयोगाने देशातील विविध राजकीय पक्षांना दिली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने याबाबतचे एक प्रसिद्धीपत्रक जाहीर केले आहे.