नरेंद्र मोदींच्या बैठकीपूर्वी निवडणूक आयोगाची जम्मू-काश्मीरमधील सर्व जिल्हाधिकाऱ्यांसोबत बैठक

By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2021 09:08 AM2021-06-24T09:08:18+5:302021-06-24T09:09:01+5:30

Jammu and Kashmir : निवडणूक आयोगाची बैठक दोन टप्प्यात पार पडली. पहिली बैठक सकाळी 11 ते दुपारी 12.30 या वेळेत आणि नंतर दुसरी बैठक दुपारी 1.30 ते दुपारी 3 या वेळेत घेण्यात आली.

Election Commission meeting with all District Collectors of Jammu and Kashmir before Narendra Modi's meeting | नरेंद्र मोदींच्या बैठकीपूर्वी निवडणूक आयोगाची जम्मू-काश्मीरमधील सर्व जिल्हाधिकाऱ्यांसोबत बैठक

नरेंद्र मोदींच्या बैठकीपूर्वी निवडणूक आयोगाची जम्मू-काश्मीरमधील सर्व जिल्हाधिकाऱ्यांसोबत बैठक

googlenewsNext

नवी दिल्ली/श्रीनगर : जम्मू-काश्मीरमधील (Jammu Kashmir) राजकीय घडामोडींना वेग आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज जम्मू काश्मीरबाबत बैठक होणार आहे. यात बैठकीला जम्मू काश्मीरमधील सर्वपक्षीय नेत्यांना बोलावण्यात आले आहे. मात्र, या बैठकीपूर्वी निवडणूक आयोगाने (Election Commission) सर्व 20 जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क साधला आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, निवडणूक आयोगाचे उपायुक्त चंद्र भूषण कुमार यांनी जिल्हाधिकार्‍यांशी संभाव्य निवडणुकांबाबत चर्चा केली. (election commission holds meeting with all 20 district magistrates of jammu and kashmir)

इंग्रजी वृत्तपत्र ‘इंडियन एक्स्प्रेस’ च्या वृत्तानुसार, जम्मू-काश्मीरच्या या सर्व मुद्द्यांवर चर्चा करण्यास सरकार तयार असल्याचे सूत्रांनी संकेत दिले आहेत. परंतु सध्या पंतप्रधानांच्या बैठकीत सीमांकन आणि जम्मू-काश्मीरमध्ये लवकरात लवकर निवडणुका घेण्यावर भर देण्यात येणार आहे.

वृत्तपत्राच्या माहितीनुसार, निवडणूक आयोगाची बैठक दोन टप्प्यात पार पडली. पहिली बैठक सकाळी 11 ते दुपारी 12.30 या वेळेत आणि नंतर दुसरी बैठक दुपारी 1.30 ते दुपारी 3 या वेळेत घेण्यात आली. पहिल्या टप्प्यात जम्मू, सांबा, राजौरी, पुंछ, कुपवाडा, बांदीपोरा, बारामुल्ला, श्रीनगर, गांदरबल आणि बडगामचे जिल्हाधिकारी सहभागी झाले होते, तर दुसऱ्या टप्प्यात किश्तवाड, डोडा, रामबन, उधमपूर, रियासी, कठुआ, पुलवामा, शोपियां, कुलगाम आणि अनंतनागमधील जिल्हाधिकारी उपस्थित होते.

या बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांना विधानसभा मतदार संघातील मतदारांच्या समस्येबाबत विचारण्यात आले. तसेच, मतदारांना मतदानासाठी लांब पल्ल्याचा प्रवास करावा लागणार आहे किंवा इतर कोणत्याही जिल्ह्यात विधानसभा येत असल्यास याचीही माहिती घेण्यात आली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या अहवालात असा दावा करण्यात आला आहे की, अशा प्रकारच्या विधानसभा मतदारसंघाच्या संदर्भात त्यांना प्रशासकीय अडचणींबद्दल जिल्हाधिकाऱ्यांकडून माहिती घेण्यात आली.

सीमांकन आयोगाची बैठक  
सीमांकन आयोगाच्या (Delimitation Commission) एका वरिष्ठ अधिकाऱ्याने बुधवारी जम्मू-काश्मीरमधील सर्व उपायुक्तांसमवेत विद्यमान विधानसभा मतदार संघांचे पुनर्रचना आणि सात नवीन जागा तयार करण्याबाबत चर्चा केली. सूत्रांनी सांगितले की, सर्व 20 उपायुक्तांनी ऑनलाईन बैठकीत भाग घेतला, ज्यामध्ये विधानसभेच्या जागा भौगोलिकदृष्ट्या कशा आयोजित केल्या जाव्यात याबद्दल माहिती एकत्र करण्यात आली.

नरेंद्र मोदींची आज बैठक
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी 24 जूनला जम्मू काश्मीरबाबत बैठक होणार आहे. यात बैठकीला जम्मू काश्मीरमधील सर्वपक्षीय नेत्यांना बोलावण्यात आले आहे. या बैठकीत जम्मू काश्मीरबाबत मोदी सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे, असे सांगितले जात आहे. तत्पूर्वी मोदी आणि जम्मू काश्मीरमधील नेत्यांच्या बैठकीपूर्वी एलओसीवर 48 तासांचा हायअलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यासोबतच हायस्पीड इंटरनेट सेवाही बंद ठेवल्या जाऊ शकतात.


 

Web Title: Election Commission meeting with all District Collectors of Jammu and Kashmir before Narendra Modi's meeting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.