‘आप’च्या २७ आमदारांना निवडणूक आयोगाची नोटीस
By admin | Published: November 3, 2016 06:30 AM2016-11-03T06:30:30+5:302016-11-03T06:30:30+5:30
आम आदमी पार्टीच्या (आप) २७ आमदारांना अपात्र ठरवावे या नव्याने दाखल झालेल्या याचिकेनुसार निवडणूक आयोगाने त्यांना बुधवारी नोटीस बजावली.
नवी दिल्ली : लाभाचे पद स्विकारल्याबद्दल आम आदमी पार्टीच्या (आप) २७ आमदारांना अपात्र ठरवावे या नव्याने दाखल झालेल्या याचिकेनुसार निवडणूक आयोगाने त्यांना बुधवारी नोटीस बजावली.
याआधी संसदीय सचिव हे लाभाचे पद स्विकारल्याबद्दल ‘आप’च्या २१ आमदारांना अपात्र ठरविण्याची मागणी केलेल्या याचिकेवरील अंतिम युक्तिवाद १५ नोव्हेंबरपासून सुरू करणार असल्याचे आयोगाने म्हटले. लाभाचे पद स्विकारल्याबद्दल २७ आमदारांना अपात्र ठरवावे या मागणीची ताजी याचिका ही गेल्या जून महिन्यात करण्यात आली असून ती राष्ट्रपती भवनने आयोगाकडे गेल्या महिन्यात पाठविली आहे. या २७ आमदारांतील सात आमदारांबद्दल त्यांनी संसदीय सचिव हे लाभाचे पद स्विकारल्याबद्दल निवडणूक आयोग अशाच याचिकेवर आधीच विचार करीत आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)