निवडणूक आयोगाने ईव्हीएममध्ये हेराफेरी झाल्याचा आरोप फेटाळला
By admin | Published: March 16, 2017 10:29 PM2017-03-16T22:29:05+5:302017-03-16T22:29:05+5:30
गेल्या काही दिवसांपूर्वी झालेल्या निडणुकीत इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशिन (ईव्हीएम) मध्ये हेराफेरी झाल्याचा आरोप निवडणूक आयोगाने फेटाळून लावला आहे.
Next
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 16 - गेल्या काही दिवसांपूर्वी झालेल्या निडणुकीत इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशिन (ईव्हीएम) मध्ये हेराफेरी झाल्याचा आरोप निवडणूक आयोगाने फेटाळून लावला आहे.
उत्तरप्रदेश, उत्तराखंड, गोवा, पंजाब आणि मणिपूर या राज्यातील विधानसभा निवडणुकांसह महाराष्ट्रातील महापालिका निवडणुकांमध्ये केंद्रात सत्तेवर असलेल्या भारतीय जनता पार्टीने ईव्हीएममध्ये फेरफार केल्याचे आरोप काही राजकीय पक्षांनी केला आहे. यावर निवडणूक आयोग म्हणाले, ईव्हीएमच्या बाबतीत तांत्रिकदृष्ट्या आणि प्रशासकीय यंत्रणा अशी राबविण्यात आली आहे की, त्यामध्ये कोणतेही बदल सहजरित्या करणे शक्य नाही. तसेच, गेल्या निवडणुकांची प्रक्रिया पारदर्शक झाली आहे. मात्र, ईव्हीएममध्ये खरचं काही हेराफेरी झाल्याचा पुरावा जर आरोप करणा-यांनी दिला, तर याकडे गंभीरपणे पाहिले जाईल आणि चौकशी करण्यात येईल, असे निवडणूक आयोगाने म्हटले आहे. दरम्यान, कोणत्याही राजकीय पक्षांकडून किंवा उमेदवारांकडून ईव्हीएमबाबत तक्रार किंवा पुरावा अद्याप मिळाला नाही.
बहुजन समाज पक्षाच्या सर्वेसर्वा मायावती आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यासह अनेक विरोधी पक्षांकडून ईव्हीएममध्ये फेरफार झाल्याचा आरोप करण्यात आला आहे.