भारतातील EVM सुरक्षित, हॅकर्सचा दावा निवडणूक आयोगाने फेटाळला
By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2019 08:54 PM2019-01-21T20:54:24+5:302019-01-21T20:54:29+5:30
भारतात मतदानासाठी वापरण्यात येणाऱ्या EVM मशीन आपण हॅक केल्या होता असा दावा एका अमेरिकन हॅकरने केल्याने भारतीय राजकारणात खळबळ उडाली आहे.
नवी दिल्ली - भारतात मतदानासाठी वापरण्यात येणाऱ्या EVM मशीन आपण हॅक केल्या होता असा दावा एका अमेरिकन हॅकरने केल्याने भारतीय राजकारणात खळबळ उडाली आहे. मात्र भारतीय निवडणूक आयोगाने या हॅकरने केलेला दावा फेटाळून लावला आहे. निवडणूक आयोग या प्रकरणात पडू इच्छित नाही. भारतातील EVM सुरक्षित आहेत, त्यांमध्ये छेडछाड होऊ शकत नाही, या दाव्यावर आम्ही कायम आहोत, असे निवडणूक आयोगाने म्हटले आहे.
लंडनमध्ये झालेल्या एका हॅकेथॉनमध्ये भारतातील EVM आपण हॅक केल्याचा दावा एका हॅकरने केला होता. 2014 साली भाजपाने तर 2015 साली आम आदमी पक्षाने EVM हॅक करून निवडणुका जिंकल्या, असा दावा या हॅकरने केला होता. मात्र निवडणूक आयोगाने हे वृत्त फेटाळले आहे.
Election Commission: It has come to our notice that an event claiming to demonstrate EVMs used by ECI can be tampered with,has been organised in London. ECI has been wary of becoming a party to this motivated slugfest & stands by empirical facts about foolproof nature of ECI EVMs pic.twitter.com/bACXaDfzqN
— ANI (@ANI) January 21, 2019
भारतात वापरल्या जाणाऱया EVM मशीन भारत इलेक्ट्रॉनिक अँड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड कडून अत्यंत कठोर निरीक्षणाखाली तयार केल्या जातात. 2010 साली नियुक्त करण्यात आलेल्या तांत्रिक तज्ज्ञांच्या समितीच्या देखरेखीखाली हे काम पूर्ण केले जाते. दरम्यान, या प्रकरणी काही कायदेशीर मदत घेता येईल का याबाबत आम्ही वेगळा विचार करू, असे निवडणूक आयोगाने म्हटले आहे.
EC: These EVMs are manufactured in Bharat Electronics Ltd. & Electronics Corporation of India Ltd. under very strict supervisory&security conditions.There are rigorous Standard Operating Procedures observed under supervision of a Committee of technical experts constituted in 2010 https://t.co/NAgRYcAqIB
— ANI (@ANI) January 21, 2019