निवडणूक आयोगाने पकडले ६४ कोटी रुपये
By admin | Published: January 19, 2017 04:59 AM2017-01-19T04:59:10+5:302017-01-19T04:59:10+5:30
निवडणूक आयोगाच्या एका पथकाने उत्तरप्रदेशसह अन्य राज्यात ६४ कोटी रुपये पकडले आहेत.
नवी दिल्ली : निवडणूक आयोगाच्या एका पथकाने उत्तरप्रदेशसह अन्य राज्यात ६४ कोटी रुपये पकडले आहेत. खर्चावर देखरेख आणि पाळत ठेवणाऱ्या या पथकाने विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई केली आहे. निवडणूक असलेल्या या पाच राज्यात आठ कोटींची दारु आणि ड्रग्जही जप्त केले आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पंजाबमध्ये १.७८ कोटी रुपयांचे ड्रग्ज पकडण्यात आले आहेत. गोव्यात १६.७२ लाखांचे तर, मणिपूरमध्ये सात लाखांचे अंमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत. उत्तरप्रदेशात जवळपास दोन लाख लिटर दारू जप्त करण्यात आली आहे. याची अंदाजे किंमत
६ कोटी रुपये आहे.
पंजाबमध्ये दहा हजार लिटर स्पिरीट जप्त करण्यात आले आहे. याची किंमत १७ लाख रुपये आहे. उत्तरप्रदेश, पंजाब, गोवा, उत्तराखंड आणि मणिपूर या निवडणूक असलेल्या राज्यात १७ जानेवारीपर्यंत ही कारवाई करण्यात आली आहे.
>जप्त केलेली रक्कम
उत्तर प्रदेश 56 कोटी
पंजाब8.17 लाख
उत्तराखंड19 लाख
मणिपूर 6.95 लाख