पश्चिम बंगालमध्ये निवडणूक आयोगाची कारवाई, 9 मतदारसंघांत उद्या रात्री 10 वाजल्यापासून प्रचारबंदी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2019 10:06 PM2019-05-15T22:06:45+5:302019-05-15T22:11:09+5:30

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पश्चिम बंगालमध्ये होत असलेल्या हिंसेवर निवडणूक आयोगानं मोठा निर्णय घेतला आहे.

Election Commission takes action in West Bengal, publicity in 9 constituencies | पश्चिम बंगालमध्ये निवडणूक आयोगाची कारवाई, 9 मतदारसंघांत उद्या रात्री 10 वाजल्यापासून प्रचारबंदी

पश्चिम बंगालमध्ये निवडणूक आयोगाची कारवाई, 9 मतदारसंघांत उद्या रात्री 10 वाजल्यापासून प्रचारबंदी

Next

नवी दिल्लीः लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पश्चिम बंगालमध्ये होत असलेल्या हिंसेवर निवडणूक आयोगानं मोठा निर्णय घेतला आहे. राज्यात 16 तारखेपासून निवडणूक प्रचाराला बंदी घालण्यात आली आहे. नियमानुसार 17 तारखेच्या संध्याकाळी 5 वाजल्यानंतर निवडणूक प्रचार बंद व्हायला हवा. परंतु निवडणूक आयोगानं 16 मे रोजी रात्री 10 वाजल्यापासूनच प्रचारावर बंदी घातली आहे. पश्चिम बंगालमधल्या दम दम, बारासात, बसिरहाट, जयनगर, मथुरापूर, जाधवपूर, डायमंड हार्बर, दक्षिण आणि उत्तर कोलकाता या 9 लोकसभा मतदारसंघात उद्या रात्री 10 वाजल्यापासून प्रचारबंदी करण्यात आली आहे.


निवडणूक आयोगानं सांगितलं की, पहिल्यांदाच ईसीआय अनुच्छेद 324ला लागू करण्यात आलं आहे. परंतु ही अराजकता आणि हिंसेची पुनरावृत्ती थांबण्यासाठी हे प्रयत्न पुरेसे नसून शांततापूर्ण निवडणूक प्रक्रियेला ते बाधित करतात. विद्यासागर यांच्या पुतळ्याची झालेल्या विटंबनेवर आयोगानं खेद व्यक्त केला आहे. प. बंगाल सरकारनं अशा समाजकंटकांवर कारवाई केली पाहिजे, अशी आशा निवडणूक आयोगानं व्यक्त केली आहे.

तसेच ADG CID राजीव कुमार यांनाही गृह मंत्रालयात पाठवण्यात आलं आहे. त्यांना उद्या सकाळी 10 वाजता गृह मंत्रालयात रिपोर्ट सादर करावे लागणार आहेत. प्रिन्सिपल सेक्रेटरी आणि गृह सचिव यांनाही हटवण्यात येणार आहे. आयोगानं मतदान क्षेत्रात दारू आणि मादक पदार्थ्यांच्या विक्रीवर प्रतिबंध घातले आहेत. 

Web Title: Election Commission takes action in West Bengal, publicity in 9 constituencies

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.