मोठी बातमी: राष्ट्रवादी काँग्रेसचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा काढला; निवडणूक आयोगाचा निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2023 08:04 PM2023-04-10T20:04:15+5:302023-04-10T20:06:51+5:30
निवडणूक आयोगाने NCP, TMC आणि CPI चा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा काढला आहे, तर AAP ला राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता दिली आहे.
नवी दिल्ली: निवडणूक आयोगाने आज एक मोठा निर्णय घेतला. महाराष्ट्रातील मोठा पक्ष असलेला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा काढण्यात आला आहे. राष्ट्रवादीसोबत(NCP) पश्चिम बंगालमधील सत्ताधरी तृणमूल काँग्रेस(TMC) आणि कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया(CPI) राष्ट्रीय पक्षाचा दर्जा काढून घेण्यात आला आहे.
AAP राष्ट्रीय पक्ष
Election Commission grants national party status to Aam Aadmi Party
— Press Trust of India (@PTI_News) April 10, 2023
राष्ट्रीय पक्षाचा दर्जा काढून घेण्यात आलेल्या पक्षांची राष्ट्रीय स्तरावर मतदान टक्केवारी 6% पेक्षा कमी असल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. निवडणूक आयोगाच्या या निर्णयामुळे या तिन्ही पक्षांना मोठा झटका मिळाल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, निवडणूक आयोगाने काही वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या आम आदमी पार्टीला(AAP) नव्याने राष्ट्रीय पक्षाचा दर्जा दिला आहे.
Nationalist Congress Party loses national party tag: EC
— Press Trust of India (@PTI_News) April 10, 2023
राष्ट्रीय पक्षाच्या मान्यतेसाठी AAP ला गुजरात किंवा हिमाचलमध्ये 6% पेक्षा जास्त मत घेण्याची गरज होती. गुजरातमध्ये AAP ला सूमारे 13% मतदान मिळाले. या आकडेवारीच्या जोरावर आप आता राष्ट्रीय पक्ष झाला आहे. राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळवण्यासाठी चार राज्यांमध्ये किमान 6% मतदान मिळायला हवे. AAP ला यापूर्वी दिल्ली, पंजाब आणि गोवामध्ये 6% पेक्षआ जास्त मतदान मिळआले आहे.