हरियाणात निवडणुकीच्या तारखा पुढे ढकलण्याची शक्यता; भाजपाने ती चूक आणून दिली लक्षात...

By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2024 05:38 PM2024-08-25T17:38:03+5:302024-08-25T17:38:57+5:30

हरियाणामध्ये निवडणूक पुढे ढकलण्याच्या हालचाली सुरू झाल्या असून भाजपाने तारीख बदलण्याची मागणी केली आहे.

Election dates in Haryana likely to be postponed; BJP brought that mistake to mind... | हरियाणात निवडणुकीच्या तारखा पुढे ढकलण्याची शक्यता; भाजपाने ती चूक आणून दिली लक्षात...

हरियाणात निवडणुकीच्या तारखा पुढे ढकलण्याची शक्यता; भाजपाने ती चूक आणून दिली लक्षात...

लोकसभेनंतर चार राज्यांच्या निवडणुका एकत्रित घेण्याच्या चर्चा असताना निवडणूक आयोगाने जम्मू काश्मीर आणि हरियाणाच्याच निवडणुका जाहीर केल्या आहेत. महाराष्ट्र आणि झारखंडच्या निवडणुका मागाहून जाहीर केल्या जाणार आहेत. अशातच हरियाणामध्ये निवडणूक पुढे ढकलण्याच्या हालचाली सुरू झाल्या असून भाजपाने तारीख बदलण्याची मागणी केली आहे.

भाजपाच्या या मागणीवर निवडणूक आयोगही विचार करत आहे. सुत्रांनुसार आता ही निवडणूक सात किंवा आठ ऑक्टोबरला होण्याची शक्यता आहे. मंगळवारी यावर आयोग औपचारिक घोषणा करण्याची शक्यता आहे. 

१ ऑक्टोबरच्या आसपास विकेंड आणि सुट्ट्या आल्या आहेत. यामुळे लोक मतदानाऐवजी बाहेर फिरण्यासाठी जाणार आहेत. याचा परिणाम मतदानाच्या टक्केवारीवर होऊ शकतो. निवडणूक ठरविताना या गोष्टींकडे लक्ष द्यायला हवे. मतदानाच्या एक दिवस आधी आणि नंतर सुट्टी येत असेल तर अशा तारखा जाहीर करू नयेत, असे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष मोहनलाल बडौली यांनी म्हटले आहे. 

बडौली यांनी आयोगाला पत्र लिहिले आहे. यामध्ये २८ आणि २९ तारखेला शनिवार, रविवार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. तसेच दोन ऑक्टोबरला गांधी जयंती आणि तीन तारखेला अग्रसेन जयंती आहे. यामुळे ३० सप्टेंबरची एक सुट्टी टाकली की सहा दिवसांचा मोठा विकेंड येत आहे, असे यात म्हटले आहे. हे पत्र मुख्य निवडणूक अधिकारी पंकज अग्रवाल यांना प्राप्त झालेले आहे. पुढील बाबींसाठी त्यांनी ते निवडणूक आयोगाकडे पाठविले आहे. 

दोन वर्षांपूर्वी देखील पंजाब निवडणुकीवेळी अशीच परिस्थिती उद्भवली होती. तेव्हा आयोगाने निवडणुकीची तारीख बदलली होती. १४ फेब्रुवारी २०२२ ला निवडणूक होती. यानंतर दोन दिवसांनंतर लगेचच रविदास जयंती असते. पंजाबचे अनेक लोक यासाठी वाराणसीला जातात. यामुळे ही तारीख बदलून २० ऑक्टोबर करण्यात आली होती. 

Web Title: Election dates in Haryana likely to be postponed; BJP brought that mistake to mind...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.