निवडणूक ओळखपत्रामुळे तुम्हाला एक वर्षाचा तुरुंगवास होऊ शकतो; कसा तो पहा...
By ऑनलाइन लोकमत | Published: April 1, 2024 01:32 PM2024-04-01T13:32:01+5:302024-04-01T13:32:20+5:30
Election Voting Card: निवडणूक आयोग यावर काम करत आहे. काही वेळा अशी ओळखपत्रे सापडतातही. परंतु त्यावर कार्यवाही होत नाही.
निवडणूक ओळखपत्र आजही खूप महत्वाचे आहे. केवळ निवडणूक आली की नाही तर इतर सरकारी कामांसाठी देखील हे ओळखपत्र उपयोगी पडते. परंतु आजही अनेकांकडे एकापेक्षा जास्त ठिकाणची ओळखपत्रे आहेत. निवडणूक आयोग यावर काम करत आहे. काही वेळा अशी ओळखपत्रे सापडतातही. परंतु त्यावर कार्यवाही होत नाही. अशा प्रकारे एकाच व्यक्तीकडे एकपेक्षा अधिक व्होटिंग कार्ड असणे गुन्हा आहे. यासाठी १ वर्षाची शिक्षा देखील होऊ शकते.
तुमच्याकडे असेच जुने, गावाकडचे निवडणूक ओळखपत्र असेल तर ते सरेंडर करा. यासाठी ऑनलाईन आणि ऑफलाईन प्रक्रिया आहे. ऑफलाईन म्हणजेच तुमच्या तालुक्याच्या ठिकाणी तहसीलदार ऑफिसमध्ये निवडणूक विभागात जाऊन अर्ज करून तुम्ही तुमचे नको असलेले व्होटिंग कार्ड रद्द करू शकता.
ऑनलाईनसाठी तुम्हाला ईसीआयच्या वेबसाईटवर जावे लागणार आहे. तिथे तुमचा मोबाईल क्रमांक नोंदवून तुम्ही नको असलेले व्होटिंग आयडी कार्ड रजिस्टर करून ते रद्द करण्याची विनंती करू शकता. यासाठी तुम्हाला फॉर्म 7 भरावा लागणार आहे. हा फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला काही काळ वाट पहावी लागेल. तुमचे ओळखपत्र रद्द झालेय का हे तपासण्यासाठी तुम्ही स्टेटस ट्रॅक करू शकता.