मोठी बातमी! लोकसभा निवडणुकीचा बिगुल वाजणार; EC ची उद्या पत्रकार परिषद

By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2024 12:37 PM2024-03-15T12:37:36+5:302024-03-15T12:40:58+5:30

२०२४ च्या सार्वत्रिक निवडणुका आणि काही राज्यांच्या विधानसभांचे वेळापत्रक जाहीर करण्यासाठी निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद उद्या, १६ मार्च रोजी दुपारी ३ वाजता होणार आहे.

election Lok Sabha Election Commission will hold a press conference tomorrow to announce the elections | मोठी बातमी! लोकसभा निवडणुकीचा बिगुल वाजणार; EC ची उद्या पत्रकार परिषद

मोठी बातमी! लोकसभा निवडणुकीचा बिगुल वाजणार; EC ची उद्या पत्रकार परिषद

२०२४ च्या लोकसभा आणि विधानसभा सार्वत्रिक निवडणुकांचे वेळापत्रक जाहीर करण्यासाठी निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद उद्या, १६ मार्च रोजी दुपारी ३ वाजता होणार आहे.  याबाबत निवडणूक आयोगाने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'एक्स'वर माहिती दिली आहे.

आज निवडणूक आयोगाची बैठक झाली. या बैठकीनंतर उद्या पत्रकार परिषदेची घोषणा झाली. आयोगाच्या बैठकीत निवडणुका निष्पक्ष, शांततेने व्हाव्यात यासाठी संवेदनशील क्षेत्रांत आणि राज्यांमध्ये किती मनुष्यबळ तैनात करावे लागेल, याबाबतचा आढावा घेण्यात आले असल्याचे बोलले जात आहे.

महादेव जानकर शरद पवारांच्या भेटीला; महायुतीला धक्का देण्याची तयारी

सर्व पक्षांनी लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. भाजप, काँग्रेस, तृणमूल काँग्रेस आणि आम आदमी पार्टीनेही त्यांच्या उमेदवारांच्या याद्या जाहीर केल्या आहेत. २०१९ मध्ये, सार्वत्रिक निवडणुका ११ एप्रिल ते १९ मे दरम्यान सात टप्प्यांत पार पडल्या आणि २३ मे रोजी मतमोजणी झाली होती. एनडीए विरोधात विरोधी पक्षांनी एकत्र येत इंडिया आघाडी सुरू केली आहे. इंडिया आघाडीच्या जागावाटपाबाबत अजुनही बैठका सुरू आहेत. 

 

Web Title: election Lok Sabha Election Commission will hold a press conference tomorrow to announce the elections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.