लोकसभेची निवडणूक इस्लाम विरुद्ध भगवान, भाजपाच्या आमदाराची मुक्ताफळे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2018 02:18 AM2018-04-14T02:18:43+5:302018-04-14T02:18:43+5:30
भाजपाचे उत्तर प्रदेशातील आमदार सुरेंद्र सिंह यांनी २०१९मध्ये होणारी लोकसभेची निवडणूक ही ‘इस्लाम विरुद्ध भगवान’ आणि ‘पाकिस्तान विरुद्ध भारत’ अशी असेल, असे भाकीत केले आहे.
बल्लिया (उत्तर प्रदेश) : भाजपाचे उत्तर प्रदेशातील आमदार सुरेंद्र सिंह यांनी २०१९मध्ये होणारी लोकसभेची निवडणूक ही ‘इस्लाम विरुद्ध भगवान’ आणि ‘पाकिस्तान विरुद्ध भारत’ अशी असेल, असे भाकीत केले आहे.
अल्पवयीन मुलीवर (१७) बलात्कार केल्याचा आरोप असलेले भाजपाचे आमदार कुलदीप सिंह सेनगर यांचा सुरेंद्र सिंह यांनी या ११ एप्रिल रोजी बचाव केल्यावर मोठा वाद निर्माण झाला होता. बैरिया मतदारसंघाचे आमदार असलेले सुरेंद्र सिंह गुरुवारी एका कार्यक्रमानिमित्त वार्ताहरांशी बोलताना म्हणाले होते की, मला सांगा तीन मुलांच्या आईवर कोण बलात्कार करील? सेनगर यांना चुकीच्या पद्धतीने त्या गुन्ह्यात अडकविले आहे. ‘२०१९मध्ये होणारी सार्वत्रिक निवडणूक ही पाकिस्तान विरुद्ध भारत.. इस्लाम विरुद्ध भगवान अशी असेल. (वृत्तसंस्था)
> तपासाचा अहवाल द्या
लोकांनी ते स्वत: भगवानसोबत आहेत की इस्लामसोबत हे ठरवायचे आहे, असे त्यांनी म्हटले. ते म्हणाले, फूट पाडणाऱ्या शक्तींशी भारतशक्ती दोनहात करील. यापूर्वी सुरेंद्र सिंह म्हणाले होते की, एकदा भारत ‘हिंदू राष्ट्र’ बनले की जे मुस्लीम हिंदू संस्कृतीत एकरूप होऊन जातील तेच देशात राहू शकतील. फारच थोडे मुस्लीम हे देशभक्त आहेत. एकदा भारत हिंदू राष्ट्र बनले की आमच्या संस्कृतीत एकरूप झालेले मुस्लीमच फक्त भारतात राहू शकतील. जे एकरूप होऊ शकणार नाहीत ते दुसºया देशात आश्रय घ्यायला मोकळे आहेत.