राज्यसभेच्या सहा जागांसाठी निवडणूक अधिसूचना जारी; २० डिसेंबरला होणार मतदान

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2024 16:55 IST2024-11-26T16:17:58+5:302024-11-26T16:55:02+5:30

भारतीय निवडणूक आयोगाने राज्य सभेच्या सहा जागांसाठीची निवडणूक अधिसूचना जारी केली.

Election Notification Released for Six Rajya Sabha Seats; Voting will be held on December 20 | राज्यसभेच्या सहा जागांसाठी निवडणूक अधिसूचना जारी; २० डिसेंबरला होणार मतदान

राज्यसभेच्या सहा जागांसाठी निवडणूक अधिसूचना जारी; २० डिसेंबरला होणार मतदान

भारतीय निवडणूक आयोगाने राज्यसभेच्या सहा जागांसाठी निवडणुकीची अधिसूचना जारी केली आहे. २० डिसेंबर रोजी निवडणूक होणार आहे. त्याच दिवशी निकालही जाहीर होणार आहेत. आंध्र प्रदेशात तीन आणि ओडिशा, हरयाणा आणि पश्चिम बंगालमधील प्रत्येकी एका जागेवर निवडणूक होणार आहे. 

१० डिसेंबर ही नामांकनाची अंतिम तारीख आहे. ११ डिसेंबर रोजी उमेदवारी अर्जांची छाननी होणार आहे. १३ डिसेंबरपर्यंत उमेदवार आपली नावे मागे घेऊ शकतात. २० डिसेंबर रोजी सकाळी ९ ते दुपारी ४ या वेळेत मतदान होणार आहे. त्याच दिवशी सायंकाळी ५ वाजल्यापासून मतमोजणी होणार आहे.

'तुम्ही मला गप्प करू शकणार नाही...', काँग्रेसच्याच कार्यक्रमात राहुल गांधींचा माईक बंद झाला

हरयाणा आणि महाराष्ट्रातील दारूण पराभवानंतर राज्यसभा निवडणुकीतही विरोधकांची मोठी परीक्षा आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भाजपच्या नेतृत्वाखालील विरोधी पक्ष आघाडीला दारूण पराभवाला सामोरे जावे लागले आहे.

 

Web Title: Election Notification Released for Six Rajya Sabha Seats; Voting will be held on December 20

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.