इलेक्शन ‘आॅन वन क्लिक’!

By admin | Published: September 25, 2014 01:48 AM2014-09-25T01:48:14+5:302014-09-25T01:48:14+5:30

स्मार्टफोन आल्यापासून त्यावर विविध उपयुक्त अ‍ॅप्स येत आहेत. गेम्स, मनोरंजन, बातम्या आणि इतर स्वरूपांच्या अ‍ॅप्ससोबत आता निवडणुकीसाठीचेही अप्लिकेशन्स उपलब्ध झाले

Election 'One Click'! | इलेक्शन ‘आॅन वन क्लिक’!

इलेक्शन ‘आॅन वन क्लिक’!

Next

मुंबई : स्मार्टफोन आल्यापासून त्यावर विविध उपयुक्त अ‍ॅप्स येत आहेत. गेम्स, मनोरंजन, बातम्या आणि इतर स्वरूपांच्या अ‍ॅप्ससोबत आता निवडणुकीसाठीचेही अप्लिकेशन्स उपलब्ध झाले आहेत. विधानसभा निवडणुकांचा इतिहास आणि अपडेट्स मराठी व इंग्रजी भाषेतून मिळण्याची सोय यावर आहे.
महाराष्ट्र इलेक्शन टूर २०१४, माय नेता, इंडियन इलेक्शन, मुंबई व्होट्स डॉट कॉम, रिझल्ट विधानसभा यांसारखे अ‍ॅप्लिकेशन मोबाइलवर आले आहेत. यामध्ये निवडणुकांबाबतची माहिती, राज्यातील मतदारसंघांची माहिती, संभाव्य उमेदवार, चर्चेतील उमेदवार, निवडणुकीचे वेळापत्रक, उमेदवारांसाठी असणाऱ्या अटी व नियमांचीही माहिती यातून मिळणार आहे. मतदारांना मतदार याद्यांतील आपले नाव शोधण्याचीही सोय येथे उपलब्ध आहे. अँड्रॉइड फोनच्या प्ले स्टोअरमधून हे अ‍ॅप्लिकेशन डाऊनलोड करून घेता येणार आहेत.
उमेदवारी अर्ज भरणे, अर्ज माघार, प्रचार, मतदान, मतमोजणी यांबाबतच्या घडामोडींचे अपडेट्स यातून तात्काळ मिळणार आहेत. या स्मार्टफोन्सच्या माध्यमातून प्ले स्टोअरमधून हे अ‍ॅप्लिकेशन मोफत डाऊनलोड करण्याची सुविधा उपलब्ध आहे. त्यामुळे आता निवडणुकीची उत्सुकता वाढविणारी किचकट प्रक्रिया एका क्लिकवर उपलब्ध झाल्यामुळे सर्फिंगही मोठ्या प्रमाणात वाढले आहे. शिवाय, काही मेसेजिंग अ‍ॅप्सवरही राजकीय आणि निवडणुकीची चर्चा असल्यामुळे वातावरणाला राजकारणाचा रंग चढतो आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Election 'One Click'!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.