Election Resluts Live - आता तरी राम मंदिर बांधा - संजय राऊत

By admin | Published: March 11, 2017 02:38 PM2017-03-11T14:38:42+5:302017-03-11T14:44:10+5:30

राम का वनवास अब खत्म हुआ है, हम अभी राम मंदिर की अपेक्षा करते हैं, असं राऊत बोलले आहेत

Election Resluts Live - Build Ram Mandir Anyway - Sanjay Raut | Election Resluts Live - आता तरी राम मंदिर बांधा - संजय राऊत

Election Resluts Live - आता तरी राम मंदिर बांधा - संजय राऊत

Next
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 11 - उत्तरप्रदेश निवडणुकीत भाजपाने अक्षरक्ष: विरोधकांचा सुपडा साफ केला असून निर्विवाद वर्चस्व मिळवत सत्तास्थापनेचा मार्ग मोकळा केला आहे. 1991 नंतर प्रथमच भाजपाने इतक्या मोठ्या प्रमाणात बहुमत मिळवलं असून इतिहास रचला आहे. भाजपाने 310 हून जास्त जागा मिळवल्या असून उत्तरप्रदेशच्या इतिहासातील हा एक रेकॉर्डच आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी उत्तरप्रदेशात मिळवलेल्या अभुतपूर्व विजयाबद्दल भाजपचं अभिनंदन केलं असून लवकरच राम मंदिर बनवण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे. राम का वनवास अब खत्म हुआ है, हम अभी राम मंदिर की अपेक्षा करते हैं, असं राऊत म्हणाले.
 
उत्तरप्रदेशमध्ये राम मंदिर हा नेहमीच भाजपाच्या अजेंडावरील मुख्य मुद्दा राहिलेला आहे. 1991 मध्ये जेव्हा भाजपा सत्तेवर आली होती तेव्हा हाच मुद्दा घेऊन त्यांनी प्रचार केला होता. मात्र या निवडणुकीत राम मंदिराचा मुद्दा नसतानाही भाजपाने सत्ता मिळवली आहे. संजय राऊत बोलले आहेत की, 'पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचे निकाल हे लोकशाहीच्या प्रक्रियेतून आले आहेत. भाजपला मिळालेल्या यशाचं आम्ही स्वागत करतो. पंतप्रधान नरेंद्र मोदींचं आम्ही अभिनंदन करतो'. 'लोकांना जिथे पर्याय दिसला तिथे सत्ताधाऱ्यांच्या विरोधात मतदान केलं. उत्तर प्रदेशातील राजकारण बदलत आहे. विजय हा विजय असतो', असंही संजय राऊत यांनी सांगितलं.
 
यावेळी बोलताना संजय राऊत यांनी 'भाजपा आणि नरेंद्र मोदींना टोला लगावत शिवसेनेचं महत्त्व आज लक्षात येईल. आम्ही मुंबईत मोदी लाट कशी थांबवली, हे लक्षात आलं असेल', असं म्हटलं आहे. महाराष्ट्राच्या राजकारणावर या निकालाचा काही परिणाम होणार नाही', असा दावाही  संजय राऊत यांनी केला.
 
भाजपाला 1991 नंतर पहिल्यांदाच उत्तरप्रदेश निवडणुकीत इतकी मोठी आघाडी मिळाली आहे. 1991 मध्ये 419 जागांसाठी झालेल्या निवडणुकीत भाजपा 221 जागांसह बहुमत मिळवत सत्तेत आली होती. विशेष म्हणजे त्यावेळी भाजपाने राम मंदिराचा मुद्दा उचलला होता. मात्र या निवडणुकीत राम मंदिराचा उल्लेखही झाला नाही. 1991 मध्ये काँग्रेसला फक्त 46 जागा मिळाल्या होत्या. भाजपाला 31.76 टक्के मतं मिळाली होती. भाजपाला त्यावेळी 280 हून जास्त जागा आणि 40 टक्के मतं मिळण्याची आशा होती. 
 
उत्तरप्रदेशात भाजपा 1985 पासून निवडणूक लढवत आहे. पहिल्या निवडणुकीत भाजपाने 16 जागा जिंकल्या होत्या. तर 2014 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपा 328 जागांवर आघाडीवर होती. नरेंद्र मोदींची ही लाट अद्यापही कायम असून भाजपा 200 हून जास्त जागांवर आघाडीवर आहे.
 
काय होता 1991 मधील निवडणूक निकाल -
 
भाजपा - 221
काँग्रेस - 46
बसपा -  12
जनता दल - 92
जनता पार्टी - 34
 
 

Web Title: Election Resluts Live - Build Ram Mandir Anyway - Sanjay Raut

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.