Election Result 2022: पाच राज्यांचा आज फैसला! उत्तर प्रदेशात भाजपची प्रतिष्ठा लागली पणाला

By ऑनलाइन लोकमत | Published: March 10, 2022 06:55 AM2022-03-10T06:55:12+5:302022-03-10T06:55:45+5:30

पंजाबमध्ये आम आदमी पक्षाला संधी मिळेल का? मतदानोत्तर चाचण्यांनी उत्तर प्रदेशात भाजप सत्ता राखेल, असा कौल दिला असला तरी प्रत्यक्षात काय निकाल हाती येतात, याची उत्सुकता देशाला लागून राहिली आहे.

Election Result 2022: Five states decide today! BJP's reputation in Uttar Pradesh has been tarnished | Election Result 2022: पाच राज्यांचा आज फैसला! उत्तर प्रदेशात भाजपची प्रतिष्ठा लागली पणाला

Election Result 2022: पाच राज्यांचा आज फैसला! उत्तर प्रदेशात भाजपची प्रतिष्ठा लागली पणाला

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : राष्ट्रीय राजकारणाची पुढील दिशा ठरवण्याची ताकद असलेल्या उत्तर प्रदेश विधानसभेसह पाच राज्यांच्या निवडणूक निकालांत जनमत कोणाच्या बाजूने याचे उत्तर उद्या, गुरुवारी मिळणार आहे. मतदानोत्तर चाचण्यांनी उत्तर प्रदेशात भाजप सत्ता राखेल, असा कौल दिला असला तरी प्रत्यक्षात काय निकाल हाती येतात, याची उत्सुकता देशाला लागून राहिली आहे.

उत्तराखंड, मणिपूर, उत्तर प्रदेशात भाजपचीच सत्ता येण्याची शक्यता असल्याचा निष्कर्ष बहुतांश मतदानोत्तर चाचण्यांनी काढला आहे. यंदा झालेल्या विधानसभा निवडणुकांत उत्तर प्रदेशमध्ये भाजपसमोर समाजवादी पक्षाने मोठे आव्हान उभे केले आहे. बसप, काँग्रेस व इतर पक्षांना किती मते मिळतात याचाही निवडणूक निकालांवर परिणाम होईल.
गोव्यात काँग्रेस व भाजप यांच्यात तुल्यबळ लढत होऊन तिथे त्रिशंकू विधानसभा अस्तित्वात येण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.  पंजाबमध्ये गटबाजीने ग्रस्त असलेल्या काँग्रेसला हरवून आम आदमी पक्ष  सत्तेवर येऊ शकतो, असे  भाकीत जनमत चाचण्यांमध्ये वर्तविण्यात आले आहे. 

काँग्रेसची अवस्था : या पाचही राज्यांत काँग्रेसची अवस्था अधिक दयनीय होते की हा पक्ष आपली पडझड काही प्रमाणात रोखण्यात यशस्वी होतो का हेही या निकालांतून स्पष्ट होणार आहे.

प्रत्येक कर्मचाऱ्याला सॅनिटायझर, मास्क
n पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांत मतदानाच्या वेळी कोरोना प्रतिबंधक नियमांचे काटेकोर पालन करण्यात आले तशीच स्थिती मतमोजणीच्या वेळी देखील राहाणार आहे. ज्यांना सर्दी आहे किंवा ताप आहे अशांना मतमोजणी केंद्रात प्रवेश देण्यात येणार नाही. 

n मतमोजणीच्या प्रक्रियेत असलेल्या कर्मचाऱ्याला मास्क, सॅनिटायझर, फेस शिल्ड व हातमोजे दिले जाणार आहेत असे निवडणूक आयोगाने सांगितले.

Web Title: Election Result 2022: Five states decide today! BJP's reputation in Uttar Pradesh has been tarnished

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.