By Election Result: बहुमतासह सत्ता असलेल्या हिमाचल प्रदेशमध्ये भाजपावर मोठी नामुष्की, विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपा उमेदवाराचं डिपॉझिट झालं जप्त 

By ऑनलाइन लोकमत | Published: November 2, 2021 03:16 PM2021-11-02T15:16:41+5:302021-11-02T15:17:22+5:30

By Election Result Update: हिमाचल प्रदेशमधील जुब्बल कोटखाई विधानसभा मतदारसंघात BJPला मोठा धक्का बसला असून, भाजपा उमेदवार नीलम सरैईक यांचे डिपॉझिट जप्त झाले आहे.

By Election Result: BJP candidate's deposit confiscated in Himachal Pradesh | By Election Result: बहुमतासह सत्ता असलेल्या हिमाचल प्रदेशमध्ये भाजपावर मोठी नामुष्की, विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपा उमेदवाराचं डिपॉझिट झालं जप्त 

By Election Result: बहुमतासह सत्ता असलेल्या हिमाचल प्रदेशमध्ये भाजपावर मोठी नामुष्की, विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपा उमेदवाराचं डिपॉझिट झालं जप्त 

Next

सिमला - हिमाचल प्रदेशमध्ये तीन विधानसभा आणि एका लोकसभा मतदारसंघात झालेल्या पोटनिवडणुकीमध्ये भाजपाला जोरदार धक्का बसला आहे. या सर्व ठिकाणी भाजपाचे उमेदवार पराभूत झाले आहेत किंवा मोठ्या फरकाने पिछाडीवर पडले आहेत. दरम्यान, हिमाचल प्रदेशमधील जुब्बल कोटखाई विधानसभा मतदारसंघातील निकाल जाहीर झाला आहे. येथे भाजपाला मोठा धक्का बसला असून, भाजपा उमेदवार नीलम सरैईक यांचे डिपॉझिट जप्त झाले आहे. येथून काँग्रेस उमेदवार रोहित ठाकूर विजयी झाले आहे. त्यांनी अपक्ष लढणारे भाजपाचे बंडखोर उमेदवार चेतन बरागटा यांचा पराभव केला.

दरम्यान, हिमाचलमधील मोठे राजकीय घराणे असलेल्या वीरभद्र सिंह यांच्या कुटुंबानेही या निवडणुकीत आपले राजकीय वजन दाखवून दिले आहे. वीरभद्र सिंह यांच्या निधनानंतर झालेल्या निवडणुकीत त्यांची पत्नी प्रतिभा सिंह यांनी  मंडी लोकसभा मतदारसंघात निर्णायक आघाडी घेतली आहे. मंडी लोकसभा मतदारसंघाचून भाजपाने खुशाल सिंह ठाकूर यांना उमेदवारी दिली होती. मात्र ते निर्णायक विजयी आघाडी घेऊ शकले नाही. तर पक्षाने जुब्बल कोटखाई येथून नीलम सरैईक आणि फतेहपूर विधानसभा निवडणुकीत बलदेव ठाकूर यांना मैदानात उतरवले होते. मात्र या सर्वांचा पराभव झाला आहे.

देशातील विविध राज्यांमधील २९ विधानसभा आणि ३ लोकसभा मतदारसंघांच्या पोटनिवडणुकीमध्ये भाजपाला जोरदार धक्का बसला आहे. हिमाचल प्रदेश, पश्चिम बंगाल आणि राजस्थानमधील पोटनिवडणुकीत भाजपाचे सर्व उमेदवार पिछाडीवर पडले आहेत. प्रतिष्ठेच्या केलेल्या महाराष्ट्रातील देगलूर-बिलोली विधानसभा आणि केंद्रशासित दादरा नगर हवेली लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीतही भाजपाची पिछेहाट झाली आहे.

आतापर्यंत समोर आलेल्या आकडेवारीनुसार हिमाचल प्रदेशमधील तीन विधानसभा आणि एक लोकसभा, राजस्थानमधील दोन विधानसभा आणि पश्चिम बंगालमधील चार विधानसभा मतदारसंघांमध्ये झालेल्या निवडणुकीत भाजपा पिछाडीवर पडला आहे. पैकी हिमाचल प्रदेश आणि राजस्थानमध्ये काँग्रेसने मुडंडी मारली आहे. तर पश्चिम बंगालमध्ये तृणमूक काँग्रेसने भाजपाची दाणादाण उडवली आहे. 

Web Title: By Election Result: BJP candidate's deposit confiscated in Himachal Pradesh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.