Election Result - अकालींच्या उद्धट राजकारणाचा पराभव - सिद्धू
By admin | Published: March 11, 2017 12:35 PM2017-03-11T12:35:40+5:302017-03-11T12:35:40+5:30
पंजाबचा निकाल हा अकाली नेत्याच्या उद्घट राजकारणाचा पराभव आहे असे नवज्योत सिंग सिद्धू म्हणाले.
Next
ऑनलाइन लोकमत
भतिंडा, दि. 11 - पंजाबमध्ये मिळालेला विजय हे काँग्रेसचे पुनरुज्जीवन आहे. हा विजय नवीन वर्षाच्या गिफ्टसारखा आहे अशी प्रतिक्रिया काँग्रेसच्या विजयावर नवज्योतसिंह सिद्धू यांनी व्यक्त केली. पंजाबचा निकाल हा अकाली नेत्याच्या उद्घट राजकारणाचा पराभव आहे. बदल्याच राजकारण बाजूला ठेऊन पंजाबच्या आनंदासाठी एकत्र काम करुया असे नवज्योत सिंग सिद्धू म्हणाले.
पंजाबमध्ये काँग्रेसची सत्तावापसी झाली असून, 117 सदस्यांच्या पंजाबमध्ये काँग्रेसचे सर्वाधिक 74 उमेदवार आघाडीवर आहेत. बहुमतासाठी 59 जागा आवश्यक होत्या. पंजाबचा निकाल शिरोमणी अकाली दल भाजपापेक्षा आम आदमी पक्षासाठी मोठा झटका आहे. कारण काही महिन्यांपूर्वी आम आदमी पक्षाला पंजाबमध्ये सत्ता मिळेल असे म्हटले जात होते.
दोन दिवसांपूर्वी एक्झिट पोलमध्ये पंजाबमध्ये आप आणि काँग्रेसला समसमान जागा दाखवल्या होत्या. प्रत्यक्षात आपला फक्त 27 जागांवर आघाडी असून, शिरोमणी अकाली दल भाजप 16 जागांवर आघाडीवर आहेत.