Election Result Live - पंजाबमध्ये काँग्रेसची मुसंडी
By admin | Published: March 11, 2017 09:00 AM2017-03-11T09:00:15+5:302017-03-11T09:02:08+5:30
पंजाबमध्ये सत्तांतराचा अंदाज अचूक ठरत असून, काँग्रेसने मुसंडी मारली आहे. प्रारंभीचे जे केल आहेत त्यावरुन अकाली दल-भाजपा आघाडीचा दारुण पराभव होईल असे दिसत आहे.
Next
ऑनलाइन लोकमत
चंदीगड, दि. 11 - पंजाबमध्ये सत्तांतराचा अंदाज अचूक ठरत असून, काँग्रेसने मुसंडी मारली आहे. प्रारंभीचे जे केल आहेत त्यावरुन अकाली दल-भाजपा आघाडीचा दारुण पराभव होईल असे दिसत आहे. काँग्रेस 18, अकाली-भाजपा आघाडी फक्त 4 आणि आम आदमी पक्ष 10 जागांवर आघाडीवर आहे.
बहुतांश एक्झिट पोल्सनी काँग्रेस आणि आपला समसमान जागा मिळतील असा अंदाज वर्तवला होता. पण सध्या तरी काँग्रेसला बहुमत मिळू शकते असे चित्र आहे. 117 सदस्यांच्या पंजाब विधानसभेमध्ये बहुमतासाठी 59 जागांची आवश्यकता आहे. पंजाबमध्ये मागच्या दहावर्षांपासून शिरोमणी अकाली दल आणि भाजपा आघाडीची सत्ता आहे. पंजाबच्या जनतेने दरपाचवर्षांनी काँग्रेस आणि शरोमणी अकाली दलाला आलटून पालटून सत्ता दिली होती.
पण 2012 च्या विधानसभा निवडणुकीत हे चक्र मोडले. त्यावेळी शिरोमणी अकाली दल आणि भाजपा आघाडीची सत्ता कायम राहिली. पंजाबमध्ये बादल सरकारच्या कारभाराविरोधात मोठी नाराजी आहे. पंजाबमध्ये शेतक-यांच्या आत्महत्या, भ्रष्टाचार, राज्यावरील कर्जाचा बोजा हे महत्वाचे मुद्दे होते. बादल सरकार या आघाडीवर अपयशी ठरले होते. पंजाबमध्ये काँग्रेसने निवडणूक माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदरसिंग यांच्या नेतृत्वाखाली लढवली. त्यात काँग्रेसला यश मिळत असून तेच काँग्रेसतर्फे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार असू शकतात.