Election Result Live - मिठाई आणि फुलांच्या बाजारपेठाही जल्लोषासाठी सज्ज

By Admin | Published: March 11, 2017 09:53 AM2017-03-11T09:53:57+5:302017-03-11T09:58:36+5:30

पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल थोड्याच वेळात हाती येतील. विजयाचा आनंदोत्सव साजरा करण्यासाठी राजकीय पक्षांपाठोपाठ बाजारपेठाही सज्ज झाल्या आहेत.

Election Result Live - Dessert and flower markets are ready for the show | Election Result Live - मिठाई आणि फुलांच्या बाजारपेठाही जल्लोषासाठी सज्ज

Election Result Live - मिठाई आणि फुलांच्या बाजारपेठाही जल्लोषासाठी सज्ज

googlenewsNext

ऑनलाइन लोकमत

लखनौ, दि. 11 - उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, गोवा आणि मणिपूर या पाच राज्यांमध्ये झालेल्या  विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली आहे. थोड्याच वेळात 5 राज्यांतील स्पष्ट निकाल हाती येतील.  सर्व पक्षातील नेते विजयाचा दावा करत आम्हालाच बहुमत मिळणार, अशी आशा व्यक्त करत आहेत. 
 
स्पष्ट निकाल समोर आल्यानंतर हारतुरे, मिठाई, रंगांची उधळण करुन जल्लोष साजरा करण्यासाठीही प्रत्येक पक्षातील कार्यकर्ते तयारीला लागले आहेत. आता सर्व जण केवळ निकाल हाती येण्याची वाट पाहत आहे. या पार्श्वभूमीवर मिठाई, फुलांच्या बाजारपेठा सज्ज झाल्या आहेत. 
(Election Results Live - गोव्यात सत्ता समीकरणाचा सस्पेन्स, काँग्रेस आघाडीवर)
 
निवडणुकांचे निकाल हाती आल्यानंतर मिठाई आणि हारतुरे, फुलांची मागणी मोठ्या प्रमाणात होणार असल्याचे लक्षात घेऊन बाजारपेठांमध्ये मिठाई, हारतुरे बनवण्याची लगबग सुरू आहे.  मिठाईंमध्ये सर्वाधिक मागणी लाडूंची होत आहे. लाडूंनंतर बर्फीची मागणी मोठ्या प्रमाणात असल्याचे दुकानांकडून सांगण्यात येत आहे. जल्लोष, विजयोत्सवात आपल्याकडून काहीही कमी होऊ नये, यासाठी काही राजकीय पक्ष स्वतः मिठाई बनवत आहेत, तर काही पक्षांनी मिठाई आणि फुलांची आधीच ऑर्डर दिली आहे.  
(Election Results Live - उत्तराखंडमध्ये भाजपा सत्तेच्या वाटेवर)
 
मिठाई, फुले आणि फटाक्यांच्या आतिषबाजी यांशिवाय निवडणुकीतील विजयोत्सव अपूर्ण असल्याचे मानले जाते. जागांचे निकाल हाती आल्यानंतर राजकीय पक्षांच्या कार्यालयात आणि नेत्यांमध्ये विजयाचा जल्लोष करण्यासाठी सुरुवात होईल. काही ठिकाणी तर जल्लोषासाठी सुरुवातही करण्यात आली आहे. 

Web Title: Election Result Live - Dessert and flower markets are ready for the show

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.