Election Result Live - इरोम शर्मिला यांचा पराभव
By admin | Published: March 11, 2017 10:37 AM2017-03-11T10:37:20+5:302017-03-11T10:49:55+5:30
मणिपूरमधील मानवाधिकार कार्यकर्त्या इरोम शर्मिला यांचा पराभव झाला आहे. मुख्यमंत्री ओकाराम इबोबीसिंग यांनी शर्मिला यांचा पराभव केला आहे.
Next
ऑनलाइन लोकमत
इंफाळ, दि. 11 - देशातल्या दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागलेल्या पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकींचा निकाल हाती येत आहेत. मुख्यमंत्री ओकाराम इबोबीसिंग यांनी मानवाधिकार कार्यकर्त्या इरोम शर्मिला यांचा पराभव करत विजय मिळवला आहे. मणिपूरच्या जनतेने थौबल येथून ओकाराम इबोबीसिंग यांना साथ दिली आहे. गेल्या पंधरा वर्षांपासून मणिपूरमध्ये काँग्रेसची सत्ता आहे.
दरम्यान, मणिपूरमध्ये भाजपाचे कमळ फुलेल असा अंदाज बहुतांश एक्झिट पोल्सनी वर्तवला होता. पण एक्झिट पोलचा अंदाज चुकल्याचे दिसत आहे. या राज्यात काँग्रेसची सत्ता कायम राहिल असा अंदाज आहे. मणिपूरमध्ये गेल्या 15 वर्षांपासून ओकाराम इबोबी सिंग यांची सत्ता आहे. टाइम्स नाऊ व्हीएमआरच्या एक्झिट पोलने मणिपूरमध्ये भाजपाला 25 ते 31, काँग्रेसला 17 ते 23 आणि इतर पक्ष व अपक्षांना 9 ते 15 जागा मिळण्याचा अंदाज वर्तवला होतातर सी-व्होटरनेही मणिपूरमध्ये भाजपाच सर्वात मोठा पक्ष ठरण्याची शक्यता वर्तवली आहे.
सी-व्होटरच्या अंदाजानुसार मणिपूरमध्ये भाजपा 28 जागांसह सर्वात मोठा पक्ष ठरेल. तर काँग्रेसला केवळ 20 जागांवर समाधान मानावे लागणार आहे. तर अन्य पक्षांना 12 पर्यंत जागा मिळू शकतात. 2012 साली झालेल्या मणिपूर विधानसभेच्या निवडणुकीत काँग्रेसला 42 जागांवर विजय मिळाला होता. तर तृणमूल काँग्रेसने 7 जागा जिंकल्या होत्या तर इतरांच्या खात्यात 11 जागा गेल्या होत्या. मात्र यावेळी सत्तेत येण्यासाठी प्रबळ दावेदार बनलेल्या भाजपाला त्यावेळी एकही जागा जिंकता आली नव्हती.
Manipur CM Okram Ibobi Singh has won from Thoubal seat #ElectionResultspic.twitter.com/yaCIai2h8j
— ANI (@ANI_news) March 11, 2017