मिझोराममध्ये सर्वात कमी वयाची महिला आमदार बनली; बॅरील व्हॅनेहसांगी कोण आहे?
By ऑनलाइन लोकमत | Published: December 5, 2023 12:43 PM2023-12-05T12:43:16+5:302023-12-05T12:43:35+5:30
२०१८मध्ये अधिकृतरीत्या झेडपीएम आघाडीची स्थापना झाली. मात्र, आयोगाकडे नोंदणीसाठी प्रतीक्षा करावी लागली.
मिझोराम विधानसभा निवडणुकीत झोरम पीपल्स मूव्हमेंटने २७ जागा जिंकल्या आहेत. तर MNF ला फक्त १० जागांवर समाधान मानावे लागले. या निवडणुकीत आणखी एक रेकॉर्ड बनला की इथं पहिल्यांदाच निवडणुकीत ३ महिलांनी विजय मिळवला. बहुमत मिळविणाऱ्या झेडपीएम पक्षाच्या बॅरील व्हॅनेहसांगी, लालरीनपुई आणि एमएनएफच्या प्रोव्हा चाक्मा यांचा विजय झाला. मावळत्या विधानसभेत एकही महिला आमदार नव्हत्या.
बॅरील व्हॅनेहसांगीनं आयजोल साऊथ ३ मधून विजय मिळवला आहे. बॅरील मिझोराममधील सर्वात कमी वयाची महिला आमदार बनली आहे. बॅरीलचं वय ३२ वर्ष आहे. ती झोरम पीपल्स मूव्हमेंटची उमेदवार होती. तिला एकूण ९३७० मते मिळाली. तर एमएनएफचे उमेदवार एफ लालराममाविया यांना ७ हजार ९५६ मते पडली. त्यामुळे बॅरील यांचा १ हजार ४१४ मतांनी विजय झाला.बॅरील व्हॅनेहसांगीनं शिलॉंगच्या नॉर्थ ईस्टर्न हिल यूनिवर्सिटीतून पदवीचं शिक्षण घेतले आहे. त्यांच्या वडिलांचे नाव वानरोचुआंग असं आहे. तसेच ती एक प्रसिद्ध टीव्ही अँकर होती.
निवडणूक आयोगाला दिलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार बॅरील यांचा कुठलाही गुन्हेगारी रेकॉर्ड नाही. याआधी ती आयजोल नगरपालिकेच्या नगरसेविका होत्या.बॅरील व्हॅनेहसांगी सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय आहे. इन्स्टाग्रामवर त्यांना २ लाख ६० हजार फोलोअर्स आहेत. मिझोरामध्ये ४० सदस्यांच्या विधानसभेत महिला आमदारांची संख्या केवळ ३ आहे. यावेळी १७४ उमेदवारांपैकी केवळ १६ उमेदवार महिला होत्या.लालदुहोमा यांनी मिझोराम पीपल्स कॉन्फरन्स, झोरम नॅशनलिस्टिक पार्टी, झोरम एक्सोडस मूव्हमेंट, झोरम डिसेंट्रलायझेशन फ्रंट, झोरम रिफॉर्मेशन फ्रंट आणि मिझोराम पीपल्स पार्टी या पक्षांना एकत्र आणले. २०१८मध्ये अधिकृतरीत्या झेडपीएम आघाडीची स्थापना झाली. मात्र, आयोगाकडे नोंदणीसाठी प्रतीक्षा करावी लागली.
असा साकारला विजय...
पक्षाने तळागाळात जाऊन प्रचार केला. स्थानिक मुद्द्यांवर भर दिला. भाजप किंवा काँग्रेससोबत आघाडी करणार नसल्याचे लालदुहोमा यांनी स्पष्ट केले होते. पक्षाचे स्वतंत्र अस्तित्व टिकवून ठेवू, असे त्यांनी म्हटले होते. राज्यातील जनतेने याच मुद्द्यांना स्वीकारत त्यांच्या पारड्यात मतांचे दान दिले. पक्षाने तळागाळात जाऊन प्रचार केला. स्थानिक मुद्द्यांवर भर दिला. भाजप किंवा काँग्रेससोबत आघाडी करणार नसल्याचे लालदुहोमा यांनी स्पष्ट केले होते.