‘एक्झिट पोल’चे अंदाज ठरले सपशेल फाेल; फक्त तेलंगणामध्ये जुळले आकडे

By ऑनलाइन लोकमत | Published: December 4, 2023 07:24 AM2023-12-04T07:24:27+5:302023-12-04T07:25:21+5:30

मात्र इतर तीन राज्यांतील निकालांचा अंदाज लागला नाही

Election Results: 'Exit Poll' predictions fail miserably; Figures matched only in Telangana | ‘एक्झिट पोल’चे अंदाज ठरले सपशेल फाेल; फक्त तेलंगणामध्ये जुळले आकडे

‘एक्झिट पोल’चे अंदाज ठरले सपशेल फाेल; फक्त तेलंगणामध्ये जुळले आकडे

मनाेज रमेश जाेशी

नवी दिल्ली : पाचपैकी चार राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर झाल्यानंतर एक्झिट पाेलच्या विश्वासार्हतेवर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. 

बहुतांश पाेल्सनी मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये भाजप काठावर पास हाेईल तर छत्तीसगड व तेलंगणामध्ये काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळणार, असे म्हटले हाेते. राजस्थान व मध्य प्रदेशात भाजप-काँग्रेसमध्ये कडवी झुंज हाेईल, असे चित्र हाेते. मात्र, तेलंगणाचा अपवाद वगळता ३ राज्यांमध्ये एक्झिट पाेलचे अंदाज पार फाेल ठरले आहेत. 

मध्य प्रदेश
मध्य प्रदेशमध्ये भाजपला सरासरी १०० ते ११५, तर काँग्रेसलाही त्याच प्रमाणात जागा मिळतील असे एक्झिट पाेलमध्ये म्हटले हाेते. केवळ ‘ॲक्सिस माय इंडिया’ आणि ‘टुडेज चाणक्य’ या संस्थांनी भाजपला १४० ते १६३ जागा मिळण्याचा अंदाज व्यक्त केला हाेता. प्रत्यक्षात भाजप १६० पेक्षा जास्त जागा जिंकून पुन्हा सत्तेवर आला. हे वगळता इतरांचे अंदाज चुकीचे ठरले.

राजस्थान
बहुतांश एक्झिट पाेलमध्ये भाजप आणि काँग्रेसला सरासरी ९० ते ११० जागा मिळतील, असे म्हटले हाेते. ‘जन की बात’, ‘मॅट्रिझ’ आणि ‘ईटीजी’ यांनी भाजपला बहुमत मिळेल. १०० ते ११८ सरासरी जागा मिळतील, असा अंदाज मांडला हाेता. प्रत्यक्षात भाजपने ११० पेक्षा जास्त जागा जिंकल्या आहेत. त्यामुळे वरील तीन वगळता इतरांचे अंदाज चुकलेले दिसतात.

छत्तीसगड
काँग्रेसला एक वगळता सर्व एक्झिट पाेलमध्ये सरासरी ४५ ते ५० जागा मिळतील, असे म्हटले हाेते. केवळ ‘जन की बात’ने भाजपला ४२ ते ५३ जागा देऊ केल्या हाेत्या. प्रत्यक्षात भाजपला ५० पेक्षा जास्त जागांवर विजय मिळाला आहे. त्यामुळे इतर सर्व एक्झिट पाेलचे अंदाज फाेल ठरले आहेत.

तेलंगणा
‘पाेलस्ट्रॅट’ वगळता सर्वच एक्झिट पाेलमध्ये काँग्रेसचे सरकार येणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला हाेता. पाेलट्रॅटने काँग्रेस आणि बीआरएसला ४८ ते ५७ जाग मिळतील, असे म्हटले हाेते. प्रत्यक्षात काँग्रेस पक्ष ६० पेक्षा जास्त जागा जिंकून पुन्हा सत्तेवर आला आहे. बीआरएसचे सरकार जाणार, हा एक्झिट पाेलचा अंदाज या राज्यात खरा ठरला.

Web Title: Election Results: 'Exit Poll' predictions fail miserably; Figures matched only in Telangana

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.