चक्क 'फुलपाखरा'साठी निवडणूक ! तब्बल ६० हजार नागरिकांनी केले मतदान

By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2020 01:17 PM2020-10-12T13:17:54+5:302020-10-12T14:37:05+5:30

राष्ट्रीय वृक्ष, प्राणी, पक्षी आणि राष्ट्रीय फुल देखील आहे. मग फुलपाखरू का नसावे, म्हणून ही निवडणूक घेण्यात आली.

Election to select ‘National Butterfly’; 60,000 citizens cast their votes | चक्क 'फुलपाखरा'साठी निवडणूक ! तब्बल ६० हजार नागरिकांनी केले मतदान

चक्क 'फुलपाखरा'साठी निवडणूक ! तब्बल ६० हजार नागरिकांनी केले मतदान

Next
ठळक मुद्देपहिल्यांदाच उपक्रम ।  ५० टक्के लोकांना नव्हती फुलपाखराबद्दल अधिक माहिती

श्रीकिशन काळे -
पुणे : राष्ट्रीय फुलपाखराची निवड करण्यासाठीची निवडणूक झाली असून, त्यात सुमारे ६० हजार नागरिकांनी आवडीच्या फुलपाखराला मतदान केले आहे. असा उपक्रम पहिल्यांदाच घेतला आणि त्याला उत्तम प्रतिसाद मिळाल्याची माहिती निवडणुक समन्वयक दिवाकर ठोंबरे यांनी ‘लोकमत’ला दिली.

राष्ट्रीय वृक्ष, प्राणी, पक्षी आणि राष्ट्रीय फुल देखील आहे. मग फुलपाखरू का नसावे, म्हणून ही निवडणूक घेण्यात आली. राष्ट्रीय फुलपाखरासाठी सात फुलपाखरू उमेदवार होते. त्यापैकी एकाची निवड नागरिकांना करायची होती. यासाठीचे ऑनलाईन मतदान ८ ऑक्टोबरला संपले असून, त्याचा अहवाल केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाकडे पाठविण्यात येणार आहे. त्यानंतर राष्ट्रीय फुलपाखराची अधिकृत घोषणा होईल. या उपक्रमाचे समन्वयक ठोंबरे म्हणाले की, या निवडणुकीत ६० हजार नागरिकांनी आपले मत नोंदवले आहे. आम्हाला एवढा प्रतिसाद येईल, असे वाटले नव्हते. मत दिलेल्यांंपैकी ४० ते ५० टक्के लोकांना फुलपाखरांची संपूर्ण माहिती नव्हती. फुलपाखरांचे एवढे प्रकार असतात, ते अंडी देतात, कोष करतात आणि अळीचे फुलपाखरू बनते ही प्रक्रिया अनेकांना माहित नव्हती. या उपक्रमाने त्याबाबतची माहिती हजारो लोकांपर्यंत गेली. संवर्धनासाठी त्याचा उपयोग होईल.

सात फुलपाखरांपैकी एक निवडायचे होते. त्यातील तीन-चार फुलपाखरांमध्ये कांटे की टक्कर झाली आहे. आता अंतिम अहवाल लवकरच पर्यावरण मंत्रालयात पाठवू. तिथल्या सचिवांशी बोलणं झालं असून, केंद्रीय पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर याविषयी उत्सुक आहेत. त्यांच्यापर्यंत हा उपक्रम पोहोचला आहे.
- दिवाकर ठोंबरे, समन्वयक, फुलपाखरू निवडणूक

कोण बाजी मारणार ?
इंडियन जझेबेल, फाइव्ह बार स्वॉर्डटेल, कृष्णा पिकॉक, यलो जॉरजोन, ऑरेंज ओकलिफ, नॉर्थन जंगलक्वीन आणि इंडियन नवाब असे सात उमेदवार आहेत. त्यात कोण बाजी मारेल, हे पाहणे उत्सुकतेचे आहे. 
 

Web Title: Election to select ‘National Butterfly’; 60,000 citizens cast their votes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Puneपुणे