अण्णाद्रमुक पक्षाचे निवडणूक चिन्ह ई. पलानीस्वामी यांच्या गटाकडे, शशिकला गटाला झटका

By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2017 06:44 PM2017-11-23T18:44:33+5:302017-11-23T19:26:53+5:30

अण्णाद्रमुक पक्षाचे निवडणूक चिन्ह मुख्यमंत्री ई. पलानीस्वामी आणि उपमुख्यमंत्री ओ. पनीरसेल्व्हम गटाकडे राहील असा निर्णय निवडणूक आयोगाने गुरुवारी दिला. या निर्णयामुळे व्ही. के. शशिकला यांच्या गटाला मोठा झटका बसला आहे.

Election symbol of AIADMK party e. Patiaswami's group, Shashikala group jolt | अण्णाद्रमुक पक्षाचे निवडणूक चिन्ह ई. पलानीस्वामी यांच्या गटाकडे, शशिकला गटाला झटका

अण्णाद्रमुक पक्षाचे निवडणूक चिन्ह ई. पलानीस्वामी यांच्या गटाकडे, शशिकला गटाला झटका

Next
ठळक मुद्देअण्णाद्रमुक पक्षाचे निवडणूक चिन्ह ई. पसानीस्वामी गटाकडेव्ही. के. शशिकला यांच्या गटाला मोठा झटकाआमदार, खासदार आणि कार्यकर्ते आमच्या सोबत - ई. पसानीस्वामी

नवी दिल्ली : अण्णाद्रमुक पक्षाचे निवडणूक चिन्ह मुख्यमंत्री ई. पलानीस्वामी आणि उपमुख्यमंत्री ओ. पनीरसेल्व्हम गटाकडे राहील असा निर्णय निवडणूक आयोगाने गुरुवारी दिला. या निर्णयामुळे व्ही. के. शशिकला यांच्या गटाला मोठा झटका बसला आहे.
निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर  ई. पलानीस्वामी यांनी आनंद व्यक्त केला आहे. तसेच, ई. पलानीस्वामी यांनी भाजपासोबत जवळीक वाढत असल्याचा आरोप सुद्धा यावेळी फेटाळून लावला आहे. अण्णाद्रमुक पक्षाचे अनेक आमदार, खासदार आणि कार्यकर्ते आमच्या सोबत आहेत, असा दावा त्यांनी यावेळी केला आहे. या सर्व बाबींचा विचार करुन निवडणूक आयोगाने निर्णय आमच्या बाजूने दिल्याचे ई. पलानीस्वामी यांनी सांगितले. 




अण्णाद्रमुक पक्षाचे दोन पानांचे निवडणूक चिन्ह ई. पलानीस्वामी आणि ओ. पनीरसेल्व्हम गटाकडे राहील, या निर्णयाची आम्हाला निवडणूक आयोगाकडून तोंडी सूचना मिळाली आहे. मात्र, आम्ही या निर्णयाच्या अधिकृत कागदपत्राची वाट पाहत आहोत, असे अद्रमुकचे खासदार व्ही. मैत्रेयन यांनी म्हटले.




दुसरीकडे, अद्रमुकमधील कथित लाच प्रकरणाची सुनावणी करताना गुरुवारी दिल्ली उच्च न्यायालयाने पोलिसांना टीटीव्ही दिनकरन यांच्याविरोधात आरोपपत्र दाखल न केल्यावरुन सुनावले आहे. न्यायालयाने पोलिसांना दोन आठवड्यांत या प्रकरणाच्या स्थितीचा अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. तर आरोपी सुकेशच्या न्यायालयीन कोठडीत 5 डिसेंबरपर्यंत वाढ केली आहे.




या महिन्याच्या सुरुवातीला अद्रमुकच्या दोन्ही गटांनी निवडणूक आयोगाकडे पक्षाच्या निवडणूक चिन्हाबाबत दावा केला होता. व्ही.के. शशिकला यांच्या गटाकडून त्यांचा पुतण्या टीटीव्ही दिनकरन हे प्रकरण पाहत होता. 



 

Web Title: Election symbol of AIADMK party e. Patiaswami's group, Shashikala group jolt

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.