Assembly Elections 2021: बिगुल वाजला... देशातील 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकांची घोषणा
By महेश गलांडे | Published: February 26, 2021 05:21 PM2021-02-26T17:21:53+5:302021-02-26T17:37:22+5:30
Assembly Elections 2021: कोरोना कालावधीत राज्यसभेच्या 18 जागांसाठी निवडणूक घेणं आव्हान होतं. त्यानंतर, बिहार विधानसभा निवडणुकांच्या मतदानाची मोठी प्रक्रिया आपण पार पाडली. त्यामुळे, आताही त्याच पद्धतीने 5 राज्यांच्या निवडणुकांची प्रक्रिया पार पडणार आहे
नवी दिल्ली - देशात होणाऱ्या आगामी 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकीसाठी सर्व राजकीय पक्ष तयारीला लागले असून निवडणूक आयोगाकडून होणाऱ्या तारखांच्या घोषणेची वाट पहात आहेत. आगामी 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकांत पुदूचेरी; आसाम ;पश्चिम बंगाल, केरळ आणि तामिळनाडू या राज्यांमध्ये निवडणुकांची रणधुमाळी पहायला मिळणार आहे. त्यासाठी, भाजपा, काँग्रेस आणि संबंधित राज्यातील स्थानिक पक्षांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केलीय. त्यासंदर्भात निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली. कोरोना नियमावलींचे पालन करुनच या निवडणुका पार पाडाव्या लागणार आहेत. Assam, Kerala, Tamil Nadu, Puducherry and West Bengal State Assembly election 2021 full schedule
कोरोना कालावधीत राज्यसभेच्या 18 जागांसाठी निवडणूक घेणं आव्हान होतं. त्यानंतर, बिहार विधानसभा निवडणुकांच्या मतदानाची मोठी प्रक्रिया आपण पार पाडली. त्यामुळे, आताही त्याच पद्धतीने 5 राज्यांच्या निवडणुकांची प्रक्रिया पार पडणार आहे. मतदारांच्या सुरक्षेची विशेष काळजी घेऊ. कोरोनामुळे नवी आव्हानं आहेत, नियम पाळून प्रक्रिया पूर्ण करू, असे निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी म्हटलं. तसेच, आसाममधील १२६, तामिळनाडू २३४, पश्चिम बंगालमध्ये २९४, केरळ १४० आणि पद्दुचेरीत ३० जागांसाठी विधानसभा निवडणूक होणार आहे.
तामिळनाडू विधानसभेचा कार्यकाळ २४ मे २०२१ रोजी, पश्चिम बंगाल विधानसभेचा कार्यकाळ ३० मे २०२१ रोजी, केरळ विधानसभेचा कार्यकाळ १ जून रोजी तर आसाम विधानसभेचा कार्यकाळ ३१ मे रोजी समाप्त होत आहे. त्यामुळे, विधानसभेचा कार्यकाळ समाप्त होण्यापूर्वी निवडणुकांसाठी मतदानप्रकिया पार पडणार आहे. विधानसभा निवडणुकांच्या तारखांची घोषणा होताच, आदर्श आचारसंहिता लागू होणार असल्याचेही अरोरा यांनी सांगितलं.
Model Code of Conduct to come into force immediately after the announcement of the election dates: Sunil Arora, Chief Election Commissioner pic.twitter.com/YL37UsKesx
— ANI (@ANI) February 26, 2021
पाच राज्यातील निवडणुकांसाठी एकूण 824 मतदारसंघात मतदान प्रकिया पार पडत असून 18.68 कोटी नागरिक आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्यासाठी, 2.7 लाख मतदान बुथ केंद्र उभारण्यात येणार आहेत. दरम्यान, पाच राज्यातील होऊ घातलेल्या विधानसभा निवडणूक कार्यक्रमासाठी मतदानाची एका तासाची वेळ वाढविली जाणार आहे, असेही निवडणूक आयोगाने स्पष्ट केलंय.
असा आहे पाच राज्यांच्या निवडणूक कार्यक्रम : -
तामिळनाडू विधानसभा निवडणूक - एकाच टप्प्यात निवडणूक होणार- ६ एप्रिल रोजी मतदान
पहिला टप्पा - २७ मार्च मतदान
दुसरा टप्पा- १ एप्रिल मतदान
तिसरा टप्पा- ६ एप्रिल मतदान
पदुच्चेरी विधानसभा निवडणूक - एकाच टप्प्यात मतदान- ६ एप्रिल रोजी मतदान
केरळ विधानसभा निवडणूक - एकाच टप्प्यात निवडणूक- ६ एप्रिल रोजी मतदान
पश्चिम बंगालमध्ये आठ टप्प्यात विधानसभा निवडणूक
पहिला टप्पा - 27 मार्च मतदान
दुसरा टप्पा - 1 एप्रिल मतदान
तिसरा टप्पा - 6 एप्रिल मतदान
चौथा टप्पा - 10 एप्रिल मतदान
पाचवा टप्पा - 17 एप्रिल मतदान
सहावा टप्पा- 22 एप्रिल मतदान
सातवा टप्पा- 26एप्रिल मतदान
आठवा टप्पा- २९ एप्रिल मतदान
पाचही राज्यांचा निवडणूक निकाल एकाच दिवशी म्हणजे २ मे रोजी जाहीर होणार