१३ फेब्रुवारीला पोटनिवडणूक
By admin | Published: January 13, 2016 04:09 AM2016-01-13T04:09:38+5:302016-01-13T04:09:38+5:30
महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, कर्नाटक आणि पंजाबसह एकूण आठ राज्यांमधील विधानसभेच्या १२ जागांसाठी येत्या १३ फेब्रुवारी रोजी पोटनिवडणूक घेण्यात येणार आहे. निवडणूक आयोगाने
Next
नवी दिल्ली : महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, कर्नाटक आणि पंजाबसह एकूण आठ राज्यांमधील विधानसभेच्या १२ जागांसाठी येत्या १३ फेब्रुवारी रोजी पोटनिवडणूक घेण्यात येणार आहे. निवडणूक आयोगाने मंगळवारी या पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला. पोटनिवडणुका होणाऱ्या मतदारसंघात महाराष्ट्रातील पालघर मतदारसंघाचा समावेश आहे.
उत्तर प्रदेशच्या मुजफ्फरनगर, देवबंद व बिकापूर येथे तर कर्नाटकच्या देवदुर्गा, बीदर आणि हेब्बाळ या तीन मतदारसंघात पोटनिवडणूक घेण्यात येणार आहे. याशिवाय पंजाबमधील खाद्दूर साहिब, बिहारमधील हरलाखी, आदींचा समावेश आहे.