राज्यसभेच्या 18 जागांसाठी 19 जूनला मतदान, निवडणूक आयोगाची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 1, 2020 07:13 PM2020-06-01T19:13:06+5:302020-06-01T19:20:13+5:30

गेल्या फब्रुवारी महिन्यात आयोगाने 17 राज्यांत 55 जागा भरण्यासाठी निवडणुकीची घोषणा केली होती. यानंतर मार्च महिन्यात 10 राज्यांत 37 जागा बिनविरोध भरल्या गेल्या.

Elections For the 18 Seats fo Rajya Sabha To Be Held On June 19 sna | राज्यसभेच्या 18 जागांसाठी 19 जूनला मतदान, निवडणूक आयोगाची घोषणा

राज्यसभेच्या 18 जागांसाठी 19 जूनला मतदान, निवडणूक आयोगाची घोषणा

googlenewsNext
ठळक मुद्देगेल्या फब्रुवारी महिन्यात आयोगाने 17 राज्यांत 55 जागा भरण्यासाठी निवडणुकीची घोषणा केली होती.मार्च महिन्यात 10 राज्यांत 37 जागा बिनविरोध भरल्या गेल्या.18 जागांसाठी निवडणूक घेण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतला आहे.


नवी दिल्ली : राज्यसभेच्या 18 रिक्त जागांसाठी 19 जूनला निवडणूक होणार आहे. यासंदर्भात सोमवारी निवडणूक आयोगाने घोषणा केली. या जागांसाठी मार्च महिन्यातच मतदान होणार होते. मात्र, कोरोना व्हायरस महामारी आणि देशव्यापी लॉकडाउनच्या पार्श्वभूमीवर ते टाळण्यात आले. मात्र, आता लॉकडाउनमध्ये मोकळीक दिली जात असल्याने निवडणूक आयोगाने या जागांसाठी निवडणुकीची घोषणा केली आहे.

निवडणूक आयोगाने म्हटले आहे, की निवडणुकीची व्यवस्था करताना कोरोनाच्या प्रतिबंधांसंदर्भातील नियमांचे पालन व्हावे, यासाठी मुख्य सचिवांना एका वरिष्ठ अधिकाऱ्याची प्रतिनियुक्ती करण्यास सांगण्यात आले आहे. 

गेल्या फब्रुवारी महिन्यात आयोगाने 17 राज्यांत 55 जागा भरण्यासाठी निवडणुकीची घोषणा केली होती. यानंतर मार्च महिन्यात 10 राज्यांत 37 जागा बिनविरोध भरल्या गेल्या. तर आता 18 जागांसाठी निवडणूक घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, असे निवडणूक आयोगाने सांगितले.

George Floyd death: अमेरिकेत 52 वर्षांनंतर सर्वात मोठा हिसाचार; 40 शहरांमध्ये कर्फ्यू

यात आंध्र प्रदेश आणि गुजरातच्या प्रत्येकी 4 जागा, मध्य प्रदेश आणि राजस्थानच्या प्रत्येकी 3 जागा, झारखंडच्या 2 आणि ईशान्येकडील राज्यांतील मेघालय आणि मणिपूरच्या प्रत्येकी एका जागेचा समावेश आहे. या जागांसाठी 19 जूनला सकाळी 9 वाजता मतदान सुरू होईल. 

धक्कादायक दावा! चीन नव्हे, युरोपात होता कोरोनाचा पहिला रुग्ण; नोव्हेंबरमध्ये समोर आली होती पहिली केस

Web Title: Elections For the 18 Seats fo Rajya Sabha To Be Held On June 19 sna

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.