Elections 2022: विधानसभा निवडणूक प्रचार सभांवरील बंदी 11 फेब्रुवारीपर्यंत पुढे ढकलली; निवडणूक आयोगाचा महत्त्वपूर्ण निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2022 04:24 PM2022-01-31T16:24:47+5:302022-01-31T16:30:01+5:30

Elections 2022 : केंद्रीय निवडणूक आयोगाच्या सोमवारी झालेल्या बैठकीत हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला.

Elections 2022 : Election Commission Extends Ban On Rallies & Processions Till February 11 | Elections 2022: विधानसभा निवडणूक प्रचार सभांवरील बंदी 11 फेब्रुवारीपर्यंत पुढे ढकलली; निवडणूक आयोगाचा महत्त्वपूर्ण निर्णय

Elections 2022: विधानसभा निवडणूक प्रचार सभांवरील बंदी 11 फेब्रुवारीपर्यंत पुढे ढकलली; निवडणूक आयोगाचा महत्त्वपूर्ण निर्णय

Next

नवी दिल्ली : पाच राज्यांमधील आगामी विधानसभा निवडणुकीसाठी प्रचार सभांवरील बंदी 11 फेब्रुवारीपर्यंत वाढवण्यात आली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या सोमवारी झालेल्या बैठकीत हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. यासोबतच, केंद्रीय निवडणूक आयोगाने मतदानाच्या पहिल्या दोन टप्प्यांमध्ये मतदारसंघात जास्तीत जास्त 1000 लोकांच्या सार्वजनिक सभांना परवानगी दिली आणि घरोघरी प्रचारासाठीचे नियमही शिथिल केले आहेत.

एका निवेदनात आयोगाने म्हटले आहे की, घरोघरी जाणाऱ्या प्रचारात (Door To Door Campaign) सुरक्षा कर्मचार्‍यांना वगळून आता 10 जणांऐवजी 20 लोक सहभागी होऊ शकतील, तर इनडोअर प्रचार सभांसाठी लोकांची क्षमताही 300 वरून 500 पर्यंत वाढवण्यात आली आहे. कोरोना निर्बंधांसह नियुक्त मोकळ्या जागांवर प्रचारासाठी व्हिडिओ व्हॅनलाही परवानगी देण्यात आली आहे.

दरम्यान, निवडणूक आयोगाने 8 जानेवारी रोजी उत्तर प्रदेश, उत्तराखंड, गोवा, पंजाब आणि मणिपूरमधील विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर करताना 15 जानेवारीपर्यंत प्रचार सभा, रोड शो आणि बाईक रॅली आणि अशा इतर प्रचार कार्यक्रमांवर बंदी घालण्याची घोषणा केली होती. 15 जानेवारी रोजी आयोगाने हे निर्बंध 22 जानेवारीपर्यंत आणि नंतर 31 जानेवारीपर्यंत वाढवले होते.

यूपीमध्ये 10 फेब्रुवारीला पहिल्या टप्प्यातील मतदान
उत्तर प्रदेशमध्ये पहिल्या दोन टप्प्यात 10 आणि 14 फेब्रुवारीला मतदान होणार आहे. 14 फेब्रुवारी रोजी उत्तराखंड आणि गोव्यात एकाच टप्प्यात मतदान होणार आहे. मणिपूरमध्ये 27 फेब्रुवारी आणि 3 मार्च रोजी दोन टप्प्यात मतदान होणार आहे, तर पंजाबमधील सर्व 117 विधानसभा जागांसाठी 20 फेब्रुवारीला एकाच टप्प्यात मतदान होणार आहे. पाचही राज्यांतील मतदान पूर्ण झाल्यानंतर 10 मार्च रोजी मतमोजणी होणार आहे.

Web Title: Elections 2022 : Election Commission Extends Ban On Rallies & Processions Till February 11

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.