जम्मू-काश्मीर, झारखंडमध्ये मतदानास सुरूवात

By admin | Published: November 25, 2014 09:04 AM2014-11-25T09:04:48+5:302014-11-25T10:25:59+5:30

जम्मू-काश्मीर व झारखंडमधील विधानसभा निवडणुकीसाठी पहिल्या टप्प्यातील मतदानासमंगळवारी सकाळी सुरूवात झाली आहे

Elections in Jammu and Kashmir, Jharkhand | जम्मू-काश्मीर, झारखंडमध्ये मतदानास सुरूवात

जम्मू-काश्मीर, झारखंडमध्ये मतदानास सुरूवात

Next

श्रीनगर/ रांची, दि. २५ -  जम्मू-काश्मीर व झारखंडमधील विधानसभा निवडणुकीसाठी पहिल्या टप्प्यातील मतदानास मंगळवारी सकाळी सुरूवात झाली आहे. काश्मीरमधील १५ व झारखंडमधील १३ मतदारसंघात आज मतदान पार पडत आहे. 

झारखंडमध्ये सकाळी ७ वाजता मतदानास सुरूवात झाली असून दुपारी ३ पर्यंत नागरिकांना मतदानाचा हक्क बजावता येणार आहे. तर काश्मीरमध्ये सकाळी ८ वाजता मतदान सुरू झाले असून दुपारी ४ पर्यंत मतदान करता येईल.

काश्मीरमधील निवडणुकीतील या पहिल्या टप्प्यातील १५ मतदारसंघात एकूण १२३ उमेदवार असून झारखंडमध्ये १९९ उमेदवारांचे भविष्य पणाला लागलेआहे. झारखंडमध्ये ज्या भागात मतदान होत आहे ते नक्षलग्रस्त असल्याने तेथे मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. 

मतदानाचा दुसरा टप्पा २ डिसेंबरला तिसरा टप्पा ९ डिसेंबर रोजी, चौथा टप्पा १४ डिसेंबर व पाचवा टप्पा २० डिसेंबर रोजी पार पडणार आहे. २३ डिसेंबर रोजी मत मोजणी पार पडणार असून निकाल हाती येतील.

 

Web Title: Elections in Jammu and Kashmir, Jharkhand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.