कर्नाटकात निवडणुकीचा बिगुल; काँग्रेस जिंकल्यास इतिहास घडेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2018 05:46 AM2018-03-28T05:46:19+5:302018-03-28T05:47:03+5:30

काँग्रेस व भाजपा या दोन्ही पक्षांनी प्रतिष्ठेच्या केलेल्या कर्नाटकातील विधानसभेच्या निवडणुका जाहीर झाल्या असून, त्याचे वातावरण आधीच तापले आहे

Elections in Karnataka; If Congress win, history will happen | कर्नाटकात निवडणुकीचा बिगुल; काँग्रेस जिंकल्यास इतिहास घडेल

कर्नाटकात निवडणुकीचा बिगुल; काँग्रेस जिंकल्यास इतिहास घडेल

Next

नवी दिल्ली : काँग्रेस व भाजपा या दोन्ही पक्षांनी प्रतिष्ठेच्या केलेल्या कर्नाटकातील विधानसभेच्या निवडणुका जाहीर झाल्या असून, त्याचे वातावरण आधीच तापले आहे. कर्नाटकात १२ मे रोजी मतदान होऊन १५ मे रोजी मतमोजणी होईल, असे मुख्य निवडणूक आयुक्त ओ. पी. रावत यांनी मंगळवारी येथे जाहीर केले. तेथे आजपासूनच आचारसंहिता लागू झाली.
विधानसभेसाठी २२४ जागांच्या अधिसूचना १७ एप्रिल रोजी निघतील. सर्वत्र एकाच दिवशी मतदान होईल. उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस २४ एप्रिल तर अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस २७ एप्रिल आहे. सर्व इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रे व्होटर व्हेरिफिअबल पेपर आॅडिट ट्रेल (व्हीव्हीपीएटी) मशीन्सशी जोडली जातील, असे रावत यांनी सांगितले.

राज्यात १९८५ पासून सत्ताधारी पक्षाला पुन्हा सत्ता मिळालेली
नाही. त्यामुळे काँग्रेस पुन्हा
विजयी झाल्यास इतिहास घडेल.

सी-फोरच्या पाहणीमध्ये काँग्रेसला १२६ जागांचे भाकीत केले असून २०१३ मध्ये मिळालेल्या जागांपेक्षा चार जास्त असतील. भाजपाला ७० जागा मिळतील.

सर्वात जास्त फटका हा जनता दलाला (धर्मनिरपेक्ष) बसेल. त्याला १३ जागा गमवाव्या लागतील व नकारात्मक मतदानाचा त्याला चार टक्के फटका बसेल.

या वेळी काँग्रेसकडे मुस्लीम व दलित मते जातील, असे दिसत आहे. त्यामुळेच तो पक्ष काँग्रेसशी आघाडी करण्यास तयार आहे. शिवाय लिंगायत समाजाला धर्माचा दर्जा सिद्धरामय्या सरकारने दिला आहे. शिवाय त्यांना धार्मिक अल्पसंख्य दर्जा मिळावा, अशी शिफारस केंद्राकडे केली आहे. त्यामुळे ती मते काँग्रेसकडेच वळतील, असे दिसत आहे. वोक्कालिगा मतांवर भाजपाची भिस्त दिसत आहे.

भाजपाला चूक मान्य
पक्षाचे आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी निवडणूक तारखांचे असे टिष्ट्वट करणे चुकीचे होते. असे व्हायला नको होते, अशी कबुली भाजपाने दिली. मालवीय यांचे टिष्ट्वट टाइम्स नाऊ या वृत्तवाहिनीच्या आधारे होते, असा खुलासा केला.

आयोगाने नेमली समिती
निवडणुकीच्या तारखा जाहीर होण्यापूर्वीच भाजपाकडून प्रसारित केल्याच्या प्रकरणाची चौकशी करून असे प्रकार पुन्हा घडू नयेत, याचे उपाय सुचविण्यासाठी आयोगाने एक समिती तातडीने नेमली. समितीस एक आठवड्यात अहवाल देण्यास सांगण्यात आले आहे.

Web Title: Elections in Karnataka; If Congress win, history will happen

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.