मतदारयादीत नाव नोंदणीचे फेसबूकवरून देणार स्मरण

By admin | Published: June 29, 2017 01:22 AM2017-06-29T01:22:18+5:302017-06-29T01:22:18+5:30

मतदान करण्यासाठी पात्र असलेला एकही मतदार सुटता कामा नये हे उद्दिष्ट डोळ््यापुढे ठेवून नागरिकांना आणि खास करून नव्याने

In the electoral roll, the name will be given through the registration box | मतदारयादीत नाव नोंदणीचे फेसबूकवरून देणार स्मरण

मतदारयादीत नाव नोंदणीचे फेसबूकवरून देणार स्मरण

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : मतदान करण्यासाठी पात्र असलेला एकही मतदार सुटता कामा नये हे उद्दिष्ट डोळ््यापुढे ठेवून नागरिकांना आणि खास करून नव्याने मतदानास पात्र ठरलेल्यांना मतदारयादीत नाव नोंदविण्याचे स्मरण करून देण्याची एक विशेष मोहीम भारत निवडणूक आयोग येत्या १ जुलैपासून हाती घेणार आहे.
विशेष म्हणजे १८ कोटी भारतीय नागरिक ‘फेसबूक’ या समाजमाध्यमाचा सक्रियतेने वापर करतात हे लक्षात घेऊन निवडणूक आयोगाने या विशेष स्मरण मोहिमेसाठी ‘फेसबूक’लाही सोबत घेतले आहे. काही राज्यांमध्ये तेथील मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी विधानसभा निवडणुकांच्या वेळी असा प्रयोग केला होता. परंतु देशपातळीवर असा उपक्रम प्रथमच हाती घेण्यात येत आहे.
आयोगाच्या प्रसिद्धी पत्रकानुसार ‘फेसबूक’वर ‘रजिस्टर नाऊ’ असे विशेष बटण यासाठी उपलब्ध केले जाईल. या माध्यमातून मतदान करण्यास पात्र असलेल्या नागरिकांना मतदारयादीत नाव नोंदविण्याचे स्मरण करून दिले जाईल. ‘फेसबूक’वर हा स्मरणसंदेश इंग्रजी, हिंदी व मराठीसह १३ भारतीय भाषांमध्ये पाठविला जाईल.‘रजिस्टर नाऊ’ या बटणावर क्लिक केले की त्या व्यक्तीस ‘नॅशनल व्होटर्स सर्व्हिसेस पोर्टल’वर (६६६.ल्ल५२स्र.्रल्ल) निर्देशित केले जाईल व तेथे त्याला मतदारयादीत नाव नोंदणीची प्रक्रिया पूर्ण करता येईल.
या नव्या प्रयोगामुळे निवडणूक आयोगाच्या मतदार नोंदणी मोहिमेस बळकटी मिळेल व भावी मतदारांना निवडणूक प्रक्रियेत सहभागी होऊन जबाबदार नागरिक होण्यास प्रोत्साहन मिळेल, याची मला खात्री
आहे.
-डॉ. नसिम झैदी,
मुख्य निवडणूक आयुक्त
लोक त्यांच्या जिव्हाळ््याच्या अशा दैनंदिन विषयांत सहभागी होण्यासाठी फेसबूकचा वापर करत असतात. निवडणूक आणि त्यातील लोकांचा सहभाग हाही असाच विषय आहे. जास्तीत जास्त लोकांच्या सहभागाने लोकशाही बळकट होते असा आमचा ठाम विश्वास असल्याने आम्ही या मतदार नोंदणी मोहिमेत आवडीने सहभागी होत आहोत.
-आंखी दास,
पब्लिक पॉलिसी डायरेक्टर, फेसबूक इंडिया

Web Title: In the electoral roll, the name will be given through the registration box

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.