इलेक्ट्रीक स्कूटर्समध्ये आग : तपासासाठी समिती, मोठा दंडही आकारला जाणार; गडकरींची माहिती
By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2022 09:49 PM2022-04-21T21:49:44+5:302022-04-21T21:53:31+5:30
गेल्या काही दिवसांमध्ये इलेक्ट्रीक वाहनांना आग लागण्याच्या (Electric Vehicle Fires Incident) अनेक घटना समोर आल्या होत्या.
गेल्या काही दिवसांमध्ये इलेक्ट्रीक वाहनांना आग लागण्याच्या (Electric Vehicle Fires Incident) अनेक घटना समोर आल्या होत्या. दरम्यान, आता या घटनांनंतर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Union Minister Nitin Gadkari) हे आता अॅक्शन मोडमध्ये आले आहेत. अशा घटना दुर्देवी असून कोणत्याही प्रकारचा निष्काळजीपणा आढळल्यास कंपन्यांना मोठा दंड ठोठावला जाईल असा इशाराही त्यांनी ट्वीटद्वारे दिला आहे.
अशा घटनांमध्ये सरकार तज्ज्ञ समितीचा अहवाल मिळाल्यानंतर आवश्यक ते आदेश जारी करेल. तसंच अशा प्रकरणांच्या चौकशीसाठी एका समितीची स्थापना केल्याची माहिती नितीन गडकरी यांनी गुरूवारी दिली. इलेक्ट्रीक वाहनांशी निगडीत काही दुर्घटना गेल्या दोन महिन्यांमध्ये समोर आल्या आहेत. यामध्ये काही जणांना आपले प्राण गमवावे लागले आणि काही जण जखमी झालेत हे अतिशय दुर्देवी आहे, असं त्यांनी ट्वीटद्वारे म्हटलं आहे.
Several mishaps involving Electric Two Wheelers have come to light in last two months. It is most unfortunate that some people have lost their lives and several have been injured in these incidents.
— Nitin Gadkari (@nitin_gadkari) April 21, 2022
“आम्ही या घटनांच्या तपासासाठी आणि पुढील पावलं काय उचलावीत याच्या शिफारसींसाठी एका तज्ज्ञ समितीची स्थापना केली आहे. अहवाल सादर केल्यानंतर यासंदर्भात आवश्यक ते आदेश जारी केले जातील,” असंही त्यांनी सांगितलं. तसंच इलेक्ट्रीक वाहनांच्या गुणवत्तेसाठी मार्गदर्शक सूचना जारी केल्या जातील. याशिवाय कोणत्याही कंपनीनं यात निष्काळजीपणा केला तर त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात दंड आकारला जाईल आणि सर्व खराब वाहनांना परत मागवण्यासंदर्भातही आदेश दिले जाणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.