अबब! वीज बिल १२८ कोटी; वृद्ध दाम्पत्य हवालदिल
By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2019 03:50 AM2019-07-22T03:50:55+5:302019-07-22T03:51:05+5:30
आपल्या पत्नीसह शमीम राहतात तिथे फक्त दोन किलोवॅटची वीज जोडणी आहे व एरवी त्यांना महिन्याला ७०० ते ८०० रुपये बिल येते.
हापूड : उत्तर प्रदेशमधील एका खासगी विद्युत पुरवठा कंपनीने १२८ कोटी ४५ लाख ९५ हजार ४४ रुपयांचे विजेचे बिल पाठविल्याने हापूड जिल्ह्याच्या चामरी गावातील शमीम हे सत्तरीतले वृद्ध हवालदिल झाले.
आपल्या पत्नीसह शमीम राहतात तिथे फक्त दोन किलोवॅटची वीज जोडणी आहे व एरवी त्यांना महिन्याला ७०० ते ८०० रुपये बिल येते. परंतु या महिन्यात त्यांना १२६ कोटींच्या थकबाकीसह वरीलप्रमाणे बिल पाठविण्यात आले. हे बिल भरले नाही म्हणून शमीम यांच्या घराचा वीजपुरवठा कापण्यात आला आहे. शमीम म्हणतात, वीज कंपनीच्या अधिकाऱ्यांना जाऊन भेटलो पण ते माझे ऐकत नव्हते. आधी बिल भरा, मगच वीजपुरवठा पुन्हा सुरू करू, हा त्यांचा हेका कायम आहे. कंपनीचे एक साहाय्यक अभियंता राम शरण म्हणाले की, कदाचित तांत्रिक चुकीमुळे एवढे बिल काढले गेले असावे.