६० लाखांची वीज चोरी

By admin | Published: December 27, 2014 11:38 PM2014-12-27T23:38:38+5:302014-12-27T23:38:38+5:30

Electricity bill of 60 lakhs | ६० लाखांची वीज चोरी

६० लाखांची वीज चोरी

Next
>२९५ ग्राहकांवर कारवाई
नागपूर : एसएनडीएलने १ ते २५ डिसेंबर दरम्यान शहरातील ६० लाखांची वीजचोरी उघडकीस आणून २९५ ग्राहक ांवर गुन्हा दाखल केला आहे.
कंपनीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ४.८८ लाख युनिट विजेची चोरी करण्यात आली. काही ग्राहकांनी मॅग्नेट व रिमोटचा वापर करून मीटरची गती कमी करून वीजचोरी केल्याचे निदर्शनास आले. काही ठिकाणी वीज तारावर हूक टाकून चोरीचा प्रकार उघडकीस आला. वीज चोरीच्या वाढत्या प्रकाराबाबत एसएनडीएलचे व्यापार प्रमुख सोनल खुराणा यांनी चिंता व्यक्त केली आहे. वीजचोरी करणाऱ्यांनी अधिकृत जोडणी घेण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Electricity bill of 60 lakhs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.