अन्य राज्याच्या तुलनेत दोन रुपयांची वीज महाग
By Admin | Published: February 7, 2016 10:46 PM2016-02-07T22:46:20+5:302016-02-07T22:46:20+5:30
जळगाव एमआयडीसीमध्ये उद्योजकांना साडे सात ते आठ रुपये युनीट प्रमाणे विजेची आकारणी होत असते. गेल्या वेळी सरकारने दहा टक्के सवलत दिल्याने ते साडे पाच रुपयांपर्यत होते. उद्योगांना अशा सवलतीत वीज उपलब्ध होण्याची उद्योजकांची अपेक्षा आहे. शेजारच्या मध्यप्रदेश, गुजरात, कर्नाटक राज्यांत महाराष्ट्रापेक्षा दोन रुपयांनी वीज स्वस्त आहे. अन्य राज्याच्या तुलनेत जळगाव औद्योगिक वसाहतीसाठी देण्यात येणारी वीज ही प्रती युनिट दोन रुपये दराने जादा का? असा प्रश्न उद्योजक उपस्थित करीत आहेत. वाढीव वीज दर हा देखील अनेक उद्योग बंद पडण्याचे महत्त्वाचे कारण मानले जात आहे.
ज गाव एमआयडीसीमध्ये उद्योजकांना साडे सात ते आठ रुपये युनीट प्रमाणे विजेची आकारणी होत असते. गेल्या वेळी सरकारने दहा टक्के सवलत दिल्याने ते साडे पाच रुपयांपर्यत होते. उद्योगांना अशा सवलतीत वीज उपलब्ध होण्याची उद्योजकांची अपेक्षा आहे. शेजारच्या मध्यप्रदेश, गुजरात, कर्नाटक राज्यांत महाराष्ट्रापेक्षा दोन रुपयांनी वीज स्वस्त आहे. अन्य राज्याच्या तुलनेत जळगाव औद्योगिक वसाहतीसाठी देण्यात येणारी वीज ही प्रती युनिट दोन रुपये दराने जादा का? असा प्रश्न उद्योजक उपस्थित करीत आहेत. वाढीव वीज दर हा देखील अनेक उद्योग बंद पडण्याचे महत्त्वाचे कारण मानले जात आहे.कोटऔद्योगिक वसाहत भागातील उद्योगांना मुलभूत सेवा व सुविधा पुरविण्याची जबाबदारी आमची आहे. उद्योजक सेवा कराची रक्कम नियमित भरत आहेत. १६ कोटी रुपयांच्या अंतर्गत रस्त्यांच्या कामांना सुरुवात झाली आहे. येत्या दोन ते तीन महिन्यांमध्ये पथदिव्यांचे काम देखील सुरु होईल. सर्व सुविधा देण्याचा आमचा प्रयत्न आहे.-जे.जी.पवार, अभियंता, औद्योगिक वसाहत विभाग, जळगाव.