बदला! बाईकचे पेपर नसल्याने पोलिसाने पावती फाडली; लाईनमनने थेट पोलीस ठाण्याची वीज कापली

By ऑनलाइन लोकमत | Published: June 13, 2022 08:48 AM2022-06-13T08:48:18+5:302022-06-13T08:52:41+5:30

लाईनमनवर एका पोलीस निरीक्षकाने कारवाई केली. त्याला दंड ठोठावला. त्यामुळे रागावलेल्या लाईनमनने थेट पोलीस चौकीचा वीजपुरवठा खंडित केला.

electricity department lineman cut power supply of police station after bike challan done by bareilly police | बदला! बाईकचे पेपर नसल्याने पोलिसाने पावती फाडली; लाईनमनने थेट पोलीस ठाण्याची वीज कापली

फोटो - news18 hindi

googlenewsNext

नवी दिल्ली - उत्तर प्रदेशच्या बरेलीमध्ये एक अजब प्रकार समोर आला आहे. वीज विभागात लाईनमन म्हणून कार्यरत असलेल्या एका व्यक्तीने रागाच्या भरात थेट पोलिसांचाच बदला घेतला आहे. लाईनमनवर एका पोलीस निरीक्षकाने कारवाई केली. त्याला दंड ठोठावला. त्यामुळे रागावलेल्या लाईनमनने थेट पोलीस चौकीचा वीजपुरवठा खंडित केला. विजेची वायर कापून लाईनमन ती स्वत:सोबत घेऊन गेला. पोलीस चौकी अंधारात जाताच प्रभारींनी याची माहिती अधिकाऱ्यांना दिली. 

वीज विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी संपूर्ण प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले. वीज नसल्याने पोलीस कर्मचाऱ्यांना अंधारातच रात्र काढावी लागली. सध्या या घटनेची परिसरात जोरदार चर्चा रंगली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सिरौली पोलीस ठाण्याच्या परिसरातील हरदासपूर पोलीस चौकीत हा धक्कादायक प्रकार घडला. या चौकीचे प्रभारी वाहनांची तपासणी करत होते. याच दरम्यान बरसेर सब स्टेशनचे लाईनमन भगवान स्वरुप उर्फ पिंकी बाईकने तिथून जात होते. 

पोलीस निरीक्षक मोदी सिंह यांनी लाईनमनला अडवले आणि बाईकचे पेपर दाखवायला सांगितले. सध्या माझ्याकडे बाईकचे कागद नाहीत. घरून आणून दाखवेन, असं भगवान स्वरुप यांनी सांगितलं. मात्र मोदी सिंह यांनी ऐकलं नाही. त्यांनी ५०० रुपयांचा दंड ठोठावला. यामुळे भगवान स्वरुप नाराज झाले. त्यांनी वीज विभागाच्या अन्य कर्मचाऱ्यांना बोलावून घेतलं आणि पोलीस चौकीचा वीज पुरवठा खंडित केला. पोलीस कर्मचारी लाईनमनला समजावण्याचा प्रयत्न करत होते. मात्र तरीही त्यांनी विजेचं कनेक्शन पूर्ववत केलं नाही. 

हरदासपूर पोलीस चौकीत मीटरशिवाय विजेचा वापर केला जात असल्याचं स्वरुप यांनी सांगितलं. मीटरशिवाय वीज वापरली जात असल्यानं लाईन कापण्यात आल्याची आणि तार कापल्याची माहिती त्यांनी दिली. या प्रकरणाची चौकशी सुरू असल्याचं वीज विभागाचे मुख्य अभियंता असलेल्या संजय जैन म्हणाले. चौकशी अहवाल आल्यानंतर पुढील कारवाई करण्यात येईल, असं त्यांनी सांगितलं. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 
 

Web Title: electricity department lineman cut power supply of police station after bike challan done by bareilly police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.