दिवसा स्वस्त, रात्री महाग मिळेल वीज; सरकार आणणार नवे नियम, २० टक्के दर घटण्याचा अंदाज

By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2023 07:37 AM2023-06-24T07:37:53+5:302023-06-24T07:38:04+5:30

नविनीकरणीय ऊर्जेचा वापर वाढविण्यासाठी हे नियम आणले जात आहेत. त्यानुसार, दिवसा वीज २० टक्के स्वस्त, तर पिक अवरमध्ये २० टक्के महाग राहील. 

Electricity will be cheap during the day and expensive at night; Government will introduce new rules, 20 percent rate reduction is expected | दिवसा स्वस्त, रात्री महाग मिळेल वीज; सरकार आणणार नवे नियम, २० टक्के दर घटण्याचा अंदाज

दिवसा स्वस्त, रात्री महाग मिळेल वीज; सरकार आणणार नवे नियम, २० टक्के दर घटण्याचा अंदाज

googlenewsNext

नवी दिल्ली : सध्या महागड्या विजेमुळे जनता त्रस्त आहे. अशा वेळी केंद्र सरकार एका नवा फाॅर्म्युला आणण्याच्या विचारात आहे. ताे अमलात आणल्यास विजेचे बिल सुमारे २० टक्क्यांनी घटू शकते. हा फाॅर्म्युला पिक अवर अर्थात सर्वाधिक वीजवापराच्या तासांवर ठरणार आहे. ऊर्जा मंत्रालय लवकर वीज वापराबाबत नवे नियम लागू करणार आहे. नविनीकरणीय ऊर्जेचा वापर वाढविण्यासाठी हे नियम आणले जात आहेत. त्यानुसार, दिवसा वीज २० टक्के स्वस्त, तर पिक अवरमध्ये २० टक्के महाग राहील. 

पिक अवर्स काेणते?
पिक अवर्समध्ये विजेची मागणी वाढते. त्यामुळे ग्रिडवर ताण वाढताे. सकाळी ६ ते ९ आणि सायंकाळी ६ ते ९ हे तास पिक अवर्स म्हणून गृहीत धरले जाणार आहेत. सकाळी लाेकांना कामावर जाण्याची लगबग असते. तर सायंकाळच्या तासांमध्ये लाेक घरी येतात आणि एसी, पंखे किंवा टीव्हीचा वापर वाढताे.

कधीपासून हाेणार नवे नियम लागू?
व्यावसायिक आणि औद्याेगिक ग्राहकांसाठी एप्रिल २०२४ पासून हे नियम लागू हाेणार आहेत. त्याच्या वर्षभरानंतर कृषी क्षेत्र वगळता इतर ग्राहकांसाठी हे नियम लागू हाेतील.

दिवसा वापरा साैरऊर्जा
साैरऊर्जा स्वस्त आहे. त्यामुळे दिवसा या ऊर्जेचा जास्त वापर करता येईल. परिणामी दिवसा विजेचे दर कमी असतील. इतर ऊर्जा निर्मितीसाठी खर्च जास्त येताे. त्यामुळे ती महाग असते. 
    - आर. के. सिंह, ऊर्जामंत्री 

Web Title: Electricity will be cheap during the day and expensive at night; Government will introduce new rules, 20 percent rate reduction is expected

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :electricityवीज