मध्यप्रदेशात चार वर्षात वीज शिल्लक राहणार
By admin | Published: July 21, 2014 11:44 PM2014-07-21T23:44:03+5:302014-07-21T23:44:03+5:30
केंद्राकडून पर्यावरण विषयक मंजुरी तातडीने मिळाल्याने उत्साहित झालेले मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी येत्या चार वर्षात राज्यात शिल्लक राहील एवढी वीज निर्माण होईल अशी घोषणा केली.
Next
नवी दिल्ली : मध्यप्रदेशातील अनेक योजनांना केंद्राकडून पर्यावरण विषयक मंजुरी तातडीने मिळाल्याने उत्साहित झालेले मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी येत्या चार वर्षात राज्यात शिल्लक राहील एवढी वीज निर्माण होईल अशी घोषणा केली. मागील सरकारने राज्याचा विकास रोखला असला तरी केंद्रातील नव्या सरकारने तो आता रुळावर आणला असल्याची प्रतिक्रियाही त्यांनी व्यक्त केली.
अगामी काळात मध्यप्रदेश हे देशातील प्रमुख वीज उत्पादक राज्य असेल. असा विश्वास मुख्यमंत्री चौहान यांनी व्यक्त केला. आम्ही सत्ता हाती घेतली त्यावेळी राज्यात केवळ 29क्क् मेगाव्ॉट वीजेचे उत्पादन होत होते. आज आम्ही चौदा हजार मेगावॅट विजेचे उत्पादन करीत आहोत.
आमची आणखी 4क्क्क् मेगावॅट अधिक वीज उत्पादनाची तयारी आहे. त्यामुळे सन 2क्18 र्पयत राज्याची वीज उत्पादन क्षमता 2क्,क्क्क् मेगावॅटर्पयत जाण्याची अपेक्षाही चौहान यांनी व्यक्त केली. यामध्ये सौर आणि पवन ऊर्जेचा समावेश असेल. असेही त्यांनी स्पष्ट केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे वेगाने निर्णय घेणारे असल्यामुळे त्यांच्या राजवटीत देशाचा विकास अधिक वेगाने होण्याची अपेक्षाही चौहान यांनी व्यक्त केली. मध्यप्रदेशातील राष्ट्रीय महामार्गाची स्थिती वाईट असून आपण त्याकडे ही पंतप्रधानांचे लक्ष वेधले असल्याचे त्यांनी सांगितले.
(लोकमत न्यूज नेटवर्क)
4विजेसाठी स्वयंपूर्ण राज्य झाल्यानंतर आमच्याकडे जास्तीची वीज असल्यास आम्ही कमी वीज असणा:या राज्यांना मदत करु.
4संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारच्या काळात संपूर्ण देशाचा विकासच खुंटला होता. त्यामुळे मध्यप्रदेश मागे पडण्यास मुख्यमंत्र्यांना जबाबदार धरता येणार नाही .