हत्तीला बनारसी पान खाण्याचं व्यसन

By Admin | Published: May 29, 2017 04:53 PM2017-05-29T16:53:06+5:302017-05-29T17:10:49+5:30

भारतातल्या काही शहरांतील गल्ल्यांमध्ये हत्तीचा वावर बघायला मिळत असतो. रस्त्यावरून चाललेला हत्ती आपण फळं खाताना आपण पाहिला आहे.

The elephant is a addictive addict | हत्तीला बनारसी पान खाण्याचं व्यसन

हत्तीला बनारसी पान खाण्याचं व्यसन

googlenewsNext
ऑनलाइन लोकमत
भोपाळ, दि. 29- भारतातल्या काही शहरांतील गल्ल्यांमध्ये हत्तीचा वावर बघायला मिळत असतो. रस्त्यावरून चाललेला हत्ती आपण फळं खाताना आपण पाहिला आहे. हत्तीला खरंतर गणेशाचं रूप म्हणूनही त्याच्याकडे पाहिलं जातं. रस्त्याने जात असताना जर हत्ती दिसला तर अगदी सगळेच जण त्याला फळ द्यायला पुढे जातात.  त्यामुळे हे चित्र आपल्यासाठी काही नवीन नाही. पण मध्य प्रदेशमधल्या रस्त्यावर मात्र यापेक्षा वेगळं चित्रं बघायला मिळतं आहे. मध्यप्रदेशातील एका हत्तीला चक्क पान खाण्याची सवय लागली आहे. मध्यप्रदेशातील तो हत्ती कलकत्ता पान’, ‘बनारसी पान’, ‘नवरत्न पान’ खातो. 
मध्य प्रदेशमधल्या सागर जिल्ह्यात राहणाऱ्या हत्तीला हे पान खाण्याचं व्यसन लागलं आहे. तेथील पानाच्या दुकानात जोपर्यंत तो हत्ती पान खात नाही तोपर्यंत तिथून तो हत्ती पुढे जात नाही. हत्ती दुकानात यायचा काही वेळ आधी पानवाला त्याच्या आवडीचं पान तयार करून ठेवतो. हत्ती सकाळी माहूताबरोबर बाहेर पडला की पानवाल्याकडे येऊन थांबतो आणि तब्बल आठ दहा पानं खातो.
 सहा वर्षांपूर्वी हत्तीच्या माहूताने त्याला पहिल्यांदा बाजारात आणलं होतं. त्याला पाहून प्रत्येकाने फळं किंवा भाज्या देऊ केल्या शेवटी माहूत एका पानवाल्याच्या दुकानासमोर येऊन थांबला. त्याने आपल्याकडचं गोड पान हत्तीला दिलं होतं, त्याला ते पान एवढं आवडलं की काही वेळ तो तिथून निघायलाच तयार नव्हता. तेव्हापासून आतापर्यंत त्या पानाच्या दुकानात जाऊन जोपर्यंत आठ दहा मिठा पान खात नाही, तोपर्यंत हत्ती काही केल्या पुढे जात नाही. 
आश्चर्याची गोष्ट  म्हणजे हे पान खाण्यासाठी दररोज तीन किलोमीटर चालत हत्ती या दुकानात येतो. तिकडच्या प्रत्येक दुकानदाराला आता हत्तीच्या तिथे येण्याची सवय झाली आहे. 
 

 

Web Title: The elephant is a addictive addict

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.