हत्तीला पुरते फक्त दोन तासांची झोप
By admin | Published: March 7, 2017 04:12 AM2017-03-07T04:12:35+5:302017-03-07T04:12:35+5:30
प्राण्यांच्या जगात सगळ््यात जास्त ज्याची स्मृती टिकून राहते त्या हत्तीला ही स्मृती टिकवून ठेवण्यासाठी पूर्ण आठ तासांच्या झोपेची गरज नाही
नवी दिल्ली : प्राण्यांच्या जगात सगळ््यात जास्त ज्याची स्मृती टिकून राहते त्या हत्तीला ही स्मृती टिकवून ठेवण्यासाठी पूर्ण आठ तासांच्या झोपेची गरज नाही. दक्षिण अफ्रिकेतील शास्त्रज्ञांच्या एका तुकडीने दिलेल्या माहितीनुसार जंगली हत्ती एका रात्री सरासरी फक्त दोन तास झोप घेतो व ही झोप ज्या प्राण्यांच्या झोपेची रीतसर नोंद आहे त्या कोणत्याही प्राण्यांच्या झोपेपेक्षा कमी आहे. हा निष्कर्ष आश्चर्यकारक आहे कारण हत्ती हे त्यांच्या प्रदीर्घकाळ असणाऱ्या स्मृतीसाठी ओळखले जातात व स्मृती आणि झोप यांचा परस्परांशी संबंध असल्याचे अभ्यासाने दाखवले आहे. हत्तींच्या हालचाली व माग काढण्यासाठी शास्त्रज्ञांनी फिटबिटसारखे साधन वापरले. हे साधन हत्तीच्या सोंडेला जोडण्यात आले. सोंड जेव्हा पाच मिनिटांपेक्षा जास्त वेळ स्तब्ध राहिली की शास्त्रज्ञांनी आता हत्ती झोपला, असे मानले. या तुकडीने सुमारे महिनभार दोन मादी हत्तींचे निरीक्षण केले. त्यात त्या दोन तासांपेक्षा कमी झोप घेतात व दोन दिवस झोपही घेत नाही, असे दिसले. अफ्रिकन हत्ती हे पृथ्वीवर सगळ््यात कमी झोप घेणारे सस्तन प्राणी आढळले. कमी झोप घेण्याचा संबंध हा हत्तींच्या मोठ्या आकाराशी असल्याचे या अभ्यासात आढळले आहे.