अकरा श्रीमंतांनी गमावले अब्जाधीशपद

By admin | Published: March 9, 2017 01:38 AM2017-03-09T01:38:37+5:302017-03-09T01:38:37+5:30

चलनातील काळा पैसा आणि बनावट नोटा संपविण्यासाठी नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने पाचशे आणि हजारांच्या नोटांवर बंदी घातल्यामुळे, देशातील ११ श्रीमंत अब्जाधीशपदावरून

Eleven billionaire lost the bureaucracy | अकरा श्रीमंतांनी गमावले अब्जाधीशपद

अकरा श्रीमंतांनी गमावले अब्जाधीशपद

Next

नवी दिल्ली : चलनातील काळा पैसा आणि बनावट नोटा संपविण्यासाठी नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने पाचशे आणि हजारांच्या नोटांवर बंदी घातल्यामुळे, देशातील ११ श्रीमंत अब्जाधीशपदावरून पायउतार झाले आहे. दरम्यान, रिलायन्स उद्योग समूहाचे प्रमुख मुकेश अंबानी भारतातील श्रीमंतांच्या यादीत सर्वोच्च स्थानी कायम आहेत. श्रीमंतांची यादी देणाऱ्या हुरून या संस्थेने जारी केलेल्या अहवालात ही माहिती देण्यात आली आहे.
हुरूनचे भारतातील व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य संशोधक रहमान जुनैद यांनी सांगितले की, नोटाबंदीसारख्या विध्वंसक धोरणामुळे हे वर्ष भारतासाठी कठीण राहिले. दीर्घकाळासाठी मात्र, हे धोरण लाभदायक राहील, असे वाटते.

२0१७ च्या श्रीमंतांच्या यादीतील काही प्रमुख
१. मुकेश अंबानी : हे श्रीमंत भारतीयांच्या यादीत सर्वोच्च स्थानी. संपत्ती २६ अब्ज डॉलर. जागतिक पातळीवरील १३२ श्रीमंत लोकांच्या यादीत ते २८ व्या स्थानी आहेत.
२. एस. पी. हिंदुजा आणि परिवार : हिंदुजा उद्योग समूहाचे चेअरमन एस. पी. हिंदुजा दुसऱ्या स्थानी. त्यांची संपत्ती १४ अब्ज डॉलर. हिंदुजा हे चार भाऊ. त्यांची जीपी, एसपी, पीपी व एपी अशा नावाने ओळख.
३. दिलीप सिंघवी : सन फार्माचे संस्थापक दिलीप सिंघवी हे तिसऱ्या स्थानी घसरले आहेत. त्यांची मालमत्ता २२ टक्क्यांनी घसरून १४ अब्ज डॉलरवर आली आहे. सन फार्माचे समभाग १८ टक्क्यांनी घसरल्याचा फटका त्यांना बसला.

Web Title: Eleven billionaire lost the bureaucracy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.